शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

पालकमंत्र्यांच्या आदेशाने १०९ कोटींचे वाटप सुरू

By admin | Updated: March 25, 2017 00:07 IST

खरीप २०१५ मधील दुष्काळ मदतनिधीच्या वाटपाची मंदगती जिल्हा प्रशासनावर चांगलीच शेकली.

खरीप दुष्काळनिधी : शेतकऱ्यांच्या मुद्यावर ना.पोटे गंभीरअमरावती : खरीप २०१५ मधील दुष्काळ मदतनिधीच्या वाटपाची मंदगती जिल्हा प्रशासनावर चांगलीच शेकली. जिल्ह्यास ११९ कोटी प्राप्त असताना यंत्रणेद्वारा निवडणूक कामकाजाचा बाऊ केल्याने वाटप रखडले होते. याविषयी शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त होताच पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी यंत्रणेची झाडाझडती घेतली व तत्काळ निधी वाटपाचे निर्देश दिलेत. एका आठवड्यात ९४ कोटी १७ लाखांचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. अपुऱ्या पर्जन्यमानामुळे उद्भवलेल्या टंचाईवर मात करून शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. शासनाने मंडळनिहाय पीकविमा जाहीर झाल्याच्या ५० टक्के प्रमाणात पीकविमा न काढलेल्या एक लाख ९६ हजार ९०८ शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीन पिकासाठी १०९ कोटी ३६ लाखांचा निधी मंजूर केला. हा निधी १० जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयास वितरीत करण्यात आला. मात्र, लगेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत यंत्रणा व्यस्त झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना हा निधी मिळू शकला नाही. याविषयी शेतकऱ्यांच्या तक्रारी पालकमंत्र्यांना प्राप्त होताच त्यांनी यंत्रणेला जाब विचारला व तत्काळ निधीवाटपाचे निर्देश दिलेत. परिणामी शुक्रवारपर्यंत १०९ कोटींपैकी ९४ कोटी १७ लाख रूपये निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)- तर ‘झिरो बॅलेन्स’ खाते उघडाज्या शेतकऱ्यांचे बँकेत बचत खाते नसेल त्यांचे जनधन योजनेंतर्गत ‘झिरो बॅलेन्स’ खाते उघडून त्या खात्यांमध्ये मदत जमा करावी. ही मदत जमा करताना कोणत्याही शासकीय थकबाकीची वसुली करण्यात येऊ नये, असे पालकमंत्र्यांनी यंत्रणेला सांगितले. मदत मिळणाऱ्या शेतकऱ्यांची यादी ठळकपणे ग्रामपंचायतींच्या फलकावर लावा. वाटपाअभावी निधी बँकेत पडून राहिल्यास हा तात्पुरता अपहार समजून संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल, अशी तंबी देखील पालकमंत्र्यांनी दिली आहे.