शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

डीएचओंविरुद्ध विनयभंगाचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 23:14 IST

चांदूरबाजार तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी असलेल्या महिलेने जिल्हा आरोेग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांच्यासह तिघांनी विनयभंग केल्याचा आरोप तक्रारीतून केला आहे. याप्रकरणी चांदूरबाजार पोलिसांनी १७ मार्च रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत फुके, फार्मासिस्ट राजेंद्र राठी व एका महिलेविरुद्ध भादंविचे कलम ३५४, ३५४ अ, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल के ला. तक्रारीमुळे जिल्हा परिषद व आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देचांदूरबाजार तालुक्यातील घटना : तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांसह चौघांविरुद्ध गुन्हे

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चांदूरबाजार तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी असलेल्या महिलेने जिल्हा आरोेग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांच्यासह तिघांनी विनयभंग केल्याचा आरोप तक्रारीतून केला आहे. याप्रकरणी चांदूरबाजार पोलिसांनी १७ मार्च रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत फुके, फार्मासिस्ट राजेंद्र राठी व एका महिलेविरुद्ध भादंविचे कलम ३५४, ३५४ अ, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल के ला. तक्रारीमुळे जिल्हा परिषद व आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे.पोलीस सूत्रानुसार, तक्रारकर्ती पीडिता चांदूरबाजार तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून तीन आठवड्यापूर्वी रुजू झाल्या. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आसोले यांनी तासभर सहवासाची मागणी केली. तर ९ मार्च रोजी फार्मासिस्ट असलेल्या राजेंद्र राठी याने वाईट उद्देशाने बोलून विनयभंग केला. डॉ. हेमंत फुके याने आपल्याला डॉ. आसोलेंची सहवासाची मागणी पूर्ण करण्यासाठी वारंवार त्रास दिला. तर तालुकास्तरावर वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत महिलेने डॉ. आसोले, डॉ. फुके व राजेंद्र राठी यांच्याशी संगनमत करून आपल्याला वारंवार त्रास दिला. तसेच घडलेल्या प्रसंगाची वाच्यता केल्यास मारण्याची धमकी दिली. हा संपुर्ण घटनाक्रम २२ फेब्रुवारी ते १३ मार्च या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी वैद्यकीय अधिकारी असलेल्या त्या महिलेने तेथे हैदोस घातला होता. तेथील कर्मचारी त्यांच्या दहशतीत होते. वस्तुस्थिती जाणल्यानंतर त्यांना कार्यमुक्त करण्यात आले. त्या वादग्रस्त आहेत. कार्यमुक्त केले म्हणून त्यांनी खोटी तक्रार नोंदविली.- डॉ. सुरेश आसोले,जिल्हा आरोग्य अधिकारीमहिलेने वैद्यकीय सेवेतील चार जणांविरुद्ध आरोप केले आहेत. त्यामुळे घटनेची सत्यता पडताळून पाहावी लागेल. चौकशीत तथ्य आढळून आल्यास आरोपींना अटक करा, असे निर्देश अधिनस्थ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.- दिलीप झळकेपोलीस अधीक्षक‘ती’ डॉक्टर पेट्रोलची बॉटल घेऊन पोहोचली एसपी कार्यालयातआरोपींना अटक करण्याची मागणीअमरावती : विनयभंग प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करा, त्यांचे निलंबन करा, मला न्याय द्या, नाही तर मी पेट्रोल अंगावर घेऊन स्वत:ला पेटवून देईन, असा टाहो सोमवारी एका पीडित महिला डॉक्टरने पोलीस अधीक्षक कार्यालयात फोडला. ती महिला पेट्रोलची बॉटल हाती घेऊन स्वत:ला पेटवून घेण्याचा इशारा देत असल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती. पोलीस अधीक्षक दिलीप झळके कक्षात उपस्थित नसल्यामुळे इतर अधिकाऱ्यांनी पीडिताची बाजू ऐकून तिला शांत करण्याचा, कक्षाबाहेर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, न्याय मिळेपर्यंत येथून हलणार नसल्याचा पवित्रा त्या महिलेने घेतला होता.पीडित महिलेने रविवारी दुपारी चांदूरबाजार पोलिसांत जिल्हा आरोग्य अधिकाºयासह चौघांविरुद्ध तक्रार नोंदविली. विनयभंग व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप महिलेने केला. यानंतर पोलिसांनी चारही आरोपींना अटक का केली नाही, त्यांच्याविरुद्ध ठोस कारवाई करा, त्यांचे निलंबन करा, अशी मागणी घेऊन ती पीडित महिला सोमवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहोचली. पोलीस अधीक्षकांना यांना भेटण्यासाठी कक्षात जात असतानाच तिला उपस्थित अधिकारी-कर्मचाºयांनी रोखले. दरम्यान, त्या महिलेने आक्रमक पवित्रा घेऊन जवळ असलेली पेट्रोलने भरलेली बॉटल बाहेर काढली. यामुळे पोलिसांची ताराबंळ उडाली होती. काही महिला पोलिसांनी त्या महिलेजवळील पेट्रोल बॉटल हिसकावण्याचा प्रयत्न सुरू केला. झटापटीनंतर पोलिसांनी महिलेच्या हातातील बॉटल मिळविली. त्यानंतरही ती पीडित महिलेने मागणी रेटून धरल्याने प्रचंड गोंधळ उडाला होता. पोलिसांनी पीडित महिलेला कसेबसे आवरत शांत केले. त्यानंतर पीडित महिलेने माध्यमांशी संवाद साधून तिच्यावर गुदरलेला प्रसंग कथन केला.