शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

परीक्षणात पक्षपाताचा आरोप

By admin | Updated: November 9, 2014 22:26 IST

इंद्रधनुष्य महोत्सवातील स्पर्धेत चमुच्या सादरीकरण क्रम चुकला तसेच स्पर्धकांच्या परीक्षणातही चुका झाल्या. स्पर्धेच्या मूल्यांकनाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. आमच्या चमुंनी सलग ११ वर्षे विजेतेपद

मुंबई विद्यापीठ नाराज : सादरीकरणाचा क्रम चुकलाअमरावती : इंद्रधनुष्य महोत्सवातील स्पर्धेत चमुच्या सादरीकरण क्रम चुकला तसेच स्पर्धकांच्या परीक्षणातही चुका झाल्या. स्पर्धेच्या मूल्यांकनाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. आमच्या चमुंनी सलग ११ वर्षे विजेतेपद पटकाविले आहे. इंद्रधनुष्यमध्ये सर्वात्कृष्ट सादरीकरण केले आहे. मात्र निकालात पारदर्शकता नसल्याने चॅम्पियन ट्रॉफी मिळाली नाही, असा आरोप मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधी अक्षय कांबळे यांनी केला . इंद्रधनुष्य महोत्सवात मुंबई विद्यापीठातील चमुनी काही वैयक्तिक स्वरुपातील पारितोषिके मिळविली आहेत. या विद्यापीठाला एकूण ४९ गुण तर सर्वसाधारण विजेता संघ ठरलेल्या मुंबईच्याच एसएनडीटी विद्यापीठाला ५१ गुण मिळाले. केवळ दोन गुणांनी मुंबई विद्यापीठाचे जेतेपद हुकले. सलग ११ वर्षांपासून या स्पर्धेत प्राविण्यप्राप्त केलेल्या मुंबई विद्यापीठ संघाला यावेळी पराभवाचा सामना करावा लागला. २७ वर्षे झोनल स्पर्धांमध्ये मुंबईच्या चमुने विजेतेपद पटकाविले आहेत. तसेच चमुंनी नॅशनलमध्येही बाजी मारली आहे. मात्र पहिल्यांदाच केवळ दोन गुणांनी मुंबई विद्यापीठाला ट्राफी मिळाली नाही. मुंबई विद्यापीठातील चमुंच्या कलाकारांचा दर्जा उत्तम आहे. आतापर्यंत अनेक स्पर्धेमध्ये ते विजेता ठरले आहे. मात्र प्रथमच इंद्रधनुष्य २०१४ या युवा महोत्सव स्पर्धेत पारदर्शकता आढळून आली नाही. परीक्षकांनी स्पर्धेचे परीक्षण व्यवस्थित केले नाही, असे दिसून येत आहे. मूकनाट्यामध्ये मुंबईचे उत्कृष्ट कला सादर केली आहे. मात्र परीक्षणात काही चुका झाल्याचे आढळून येत आहे, असा आरोप मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधी अक्षय कांबळे व निर्मला पवार यांनी केला आहे. लोकमतशी बोलताना ते पुढे म्हणाले की इंद्रधनुष्यामध्ये जरी चॅम्पियन ट्रॉफी मिळाली नाही. मात्र उत्कृष्ट सादरीकरण सिध्द करण्याकरिता पुढील झोनल स्पर्धेत नक्कीच विजेते पद टिकवून ठेवू तेव्हाच खऱ्या अर्थाने इंद्रधनुष्य महोत्सवातील आमचे महत्त्व कळले, असे मत त्यांनी व्यक्त केले. अमरावती विद्यापीठातील स्पर्धेच्या व्यवस्थेबद्दलची चांगलेपणा त्यांनी विशद केला. विद्यापीठातील वातावरणात चार दिवस कसे गेले कळलेच नाही. सर्व चांगले मिळाले. मात्र, केवळ स्पर्धेतील परीक्षणाचा सादरीकरण क्रम चुकल्याने गोंधळ उडाला, असे त्यांनी सांगितले. सलग पाच दिवस चाललेल्या या इंद्रधनुष्य आंतरविद्यापीठ महोत्सवात राज्यातील २० विद्यापीठांच्या चमुंनी सहभाग घेतला होता. दरम्यान विविध स्पर्धेत दिमाखदार प्रदर्शन करून उपस्थितांचे लक्ष वेधले होते, हे विशेष.