शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

धामणगावात सव्वा तीनशे फुटांचा तिरंगा, सीएए समर्थनार्थ रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 19:32 IST

धामणगावात आगामी काळात या कायद्यासंदर्भात चर्चासत्र घेणार असल्याचे आमदार प्रताप अडसड यांनी सांगितले.

धामणगाव रेल्वे (अमरावती) : ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘वुई सपोर्ट सीएए’, ‘जय श्रीराम’, ‘इंडिया वाँट्स सीएए’ अशा घोषणा देत शनिवारी तालुक्यातील शेकडो नागरिक, युवक, महिला, विद्यार्थ्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचे समर्थन केले. सव्वा तीनशे फुटांच्या तिरंग्याने सर्वांचे लक्ष वेधले.

केंद्र शासनाने पारित केलेल्या दोन्ही कायद्यांच्या समर्थनार्थ लोकाधिकार मंच व विविध सामाजिक संघटना, सर्व राजकीय पक्षांच्यावतीने स्थानिक शिवाजी महाराज चौकातून ही रॅली काढण्यात आली. टिळक चौक, सिनेमा चौक, मेन लाइन,  कॉटन मार्केट चौक, अमर शहीद भगतसिंग चौक या मार्गाने भ्रमण करीत  भगतसिंग चौक येथे समारोप करण्यात आला. या रॅलीत तिरंगा, भगवा झेंडा हाती घेतलेल्या नागरिकांनी कायद्याच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.

धामणगावात आगामी काळात या कायद्यासंदर्भात चर्चासत्र घेणार असल्याचे आमदार प्रताप अडसड यांनी सांगितले. राष्ट्रहिताच्या कायद्याविषयी काही लोक जाणीवपूर्वक गैरसमज पसरवून देशातील शांतता आणि एकात्मतेला धोका निर्माण करीत आहेत. अशावेळी या कायद्याविषयी असलेला गैरसमज दूर करण्यासाठी भारत सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून समर्थन  करणे महत्त्वाचे असल्याचे मत आमदार अरुणअडसड यांनी मांडले. शहरातून प्रथमच ही विशाल रॅली काढण्यात आली.

सव्वा तीनशे फुटांचा तिरंगा महिला, विद्यार्थी, युवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने धरला होता. भारतमातेची वेशभूषा राधा शर्मा हिने साकारली. विश्व हिंदू परिषदेचे संघटनमंत्री सागर खेडकर, अशोक शर्मा, श्रीराम पत्रे, विशाल गांधी उपस्थित होते.

टॅग्स :Amravatiअमरावती