शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींच्या आरक्षणावर सर्वांचाच डोळा

By admin | Updated: July 14, 2014 00:49 IST

आरक्षणाने काहीअंशी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक

पत्रपरिषद : मधुकर पिचड यांचा आरोपअमरावती : आरक्षणाने काहीअंशी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक प्रगती करणाऱ्या आदिवासींच्या आरक्षणावर सर्वच राजकीय पक्षांच्या नजरा खिळल्या आहेत. त्यामुळे आदिवासींसाठी राखीव आरक्षणातून धनगर समाजाला आरक्षण देण्याचा डाव रचला जात असल्याचा आरोप राज्याचे आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी येथे रविवारी पत्रपरिषदेत केला.अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या अमरावती शाखेच्यावतीने आयोजित आदिवासींचा शैक्षणिक व सांस्कृतिक संघर्ष मेळाव्यात उपस्थित झाले असता त्यांनी पत्रपरिषद घेऊन आदिवासी समाजाची सद्यस्थिती मांडली. पिचड यांच्या मते, भारतीय राज्य घटना व राज्यघटनेचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आदिवासी समाजाला आरक्षण देताना संस्कृती, राहणीमान, बोली, भाषा आदी लक्षात घेत आरक्षण दिले. मात्र, आता काही राजकीय नेत्यांनी विशिष्ट समाजाला खूश ठेवण्यासाठी आदिवासींच्या वाट्याला आलेले आरक्षण पळविण्याचा डाव रचला असल्याचा आरोप त्यांनी केला. देशाच्या स्वातंत्र्यानंतर एकही जमात आदिवासींमध्ये समाविष्ट करण्यात आली नाही. मात्र लोकसभा निवडणूक आटोपताच धनगर समाजाला आरक्षण देण्याची भाषा बोलली जात आहे. या समाजाला आरक्षण देण्यास विरोध नाही. मात्र आदिवासींवर अन्याय करुन आरक्षण देणे योग्य नाही, असेही त्यांनी सांगितले. वेगवेगळ्या राज्यात समाजाच्या स्तरानुसार आरक्षण देण्यात आले आहेत. कर्नाटकात मराठा तर छत्तीसगडमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ठ करण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मराठा समाजाला आदिवासींचे आरक्षण द्यायचे काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. घटनेने ठरविलेले निकष धुळीस मिळविण्याचा कोणी कटकारस्थान रचत असतील तर आदिवासी समाज वेगळा निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मधुकर पिचड यांनी दिला. आदिवासींचे अस्तित्व धोक्यात आणण्याचे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी आदिवासी समाजातील आमदार, खासदार एकत्र येऊन केंद्र शासनाकडे साकडे घालतील, अशी माहिती त्यांनी दिली. आदिवासींच्या मूळ हक्कावर गदा आणण्यासाठी ५५ जमाती आघाडीवर आहेत. या जमातींना सर्वच राजकीय नेते खतपाणी घालत असल्याचा आरोपही त्यांनी केला.पत्रपरिषदेला विधानसभेचे उपाध्यक्ष वसंतराव पुरके, मेळघाटचे आ. केवलराम काळे, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त भास्कर वाळिंबे यांच्यासह पक्षपदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)