शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच शैक्षणिक संस्था, महाविद्यालयांत 'रॅगिंग अलर्ट', ‘व्हीएमव्ही’च्या प्रकरणाची धास्ती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 16:25 IST

विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करणे शैक्षणिक संस्था व महाविद्यालयांना अनिवार्य आहे. मात्र, मागील काही वर्षांपासून यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांकडे दुर्लक्ष केल्याचे स्थानिक विदर्भ ज्ञान व विज्ञान संस्थेत (व्हीएमव्ही)मध्ये घडलेल्या ‘अश्लील रॅगिंग’ प्रकरणामुळे उघड झाले आहे.

अमरावती, दि. 11  -  विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करणे शैक्षणिक संस्था व महाविद्यालयांना अनिवार्य आहे. मात्र, मागील काही वर्षांपासून यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांकडे दुर्लक्ष केल्याचे स्थानिक विदर्भ ज्ञान व विज्ञान संस्थेत (व्हीएमव्ही)मध्ये घडलेल्या ‘अश्लील रॅगिंग’ प्रकरणामुळे उघड झाले आहे. व्हीएमव्हीत घडलेल्या रॅगिंग प्रकरणाचा पर्दाफाश झाल्यामुळे आता जिल्ह्यातील सर्वच संस्था व महाविद्यालयांना खडबडून जाग आली आहे. त्यांनीही आता यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली आहे.      व्हीएमव्ही संस्थेने यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी केली आहे किंवा नाही, याविषयी पोलीस तपास करीत आहेत. येथील रॅगिंग प्रकरणाच्या अनुषंगाने आता जिल्ह्यातील बहुतांश संस्था व महाविद्यालयांनी यूजीसीच्या सूचनांचे पालन करण्यास सुरूवात केली आहे. यूजीसी मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रत्येक शैक्षणिक संस्था व महाविद्यालयांमध्ये ‘अ‍ॅन्टी रॅगिंग’कमिटी स्थापन करणे अनिवार्य आहे. प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांकडून प्रतिज्ञा घेणे आवश्यक आहे. मात्र, मागील काही वर्षांत याकडे अमरावती जिल्ह्यातील महाविद्यालयांनी गांभीर्याने बघितले नव्हते. 'लोकमत'ने व्हीएमव्हीच्या वसतिगृहात घडलेल्या रॅगिंग प्रकरणाला वाचा फोडल्यामुळे खळबळ उडाली. त्याच अनुषंगाने जिल्ह्यातील इतर महाविद्यालये अलर्ट झाली आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत ४१० महाविद्यालये आहेत. यासर्व महाविद्यालयांना यूजीसी गाईडलाईन्सच्या अंमलबजावणीसाठी विद्यापीठाकडून पत्र पाठविण्यात आले आहे. 

‘रॅगिंग’वर प्रतिबंध लावण्याविषयी अतापर्यंत सर्व महाविद्यालयांना पत्राद्वारे तब्बल चारवेळा कळविण्यात आले आहेत. ‘अँटी रॅगिंग समिती’ने केलेल्या कामाचा अहवालदेखील नियमित मागविला जातो. रॅगिंगवर प्रतिबंध लावण्याविषयीचे पोस्टर्सदेखील प्रत्येक महाविद्यालयाला पाठविले असून अँटी रँगिंग कमिटीचे फलकही दर्शनी भागात लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.- अ.मु.असनारे, प्रभारी संचालक, विद्यार्थी कल्याण, रासेयो विभाग, अमरावती विद्यापीठ

रॅगिंगसंदर्भात यूजीसी गाईडलाईन्सची अंमलबजावणी सर्वच संस्था व महाविद्यालयांना बंधनकारक आहे. यावर स्वंतत्ररीत्या ‘वॉच’ ठेवण्याची जबाबदारी विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाकडे सोपविण्यात आली आहे. - अतुल साळुंखे, राज्य संपर्क अधिकारी, रासेयो मंत्रालय, मुंबई.