-----------
अज्ञात कारच्या धडकेत युवक ठार
शिरखेड : रिद्धपूर येथील बसस्थानकावर एमएच २७ सीएम ७५०६ क्रमांकाच्या दुचाकीला अज्ञात कारने धडक दिली. १३ जून रोजीच्या या अपघातात गोपाल केचे (रा. दाभेरी) हा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शिरखेड पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध भादंविचे कलम २७९, ३३८, ३०४ अ अन्वये गुन्हा नोंदविला.
-----------
वरला ते रिद्धपूर मार्गावर दुचाकी लंपास
लेहगाव : शिरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरला ते रिद्धपूर मार्गावर उभी केलेली एमएच २७ सीडी १०७४ क्रमांकाची दुचाकी अज्ञात चोरट्याने १२ जून रोजी लंपास केली. विकास शहाणे (३०) हे दुचाकी उभी करून शेतात कामाला गेले होते. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.
-----------------
पुसला येथे क्षुल्लक कारणावरून मारहाण
शेंदूरजनाघाट : घराचे सेंट्रिंगचे बार बाहेर आल्याच्या कारणावरून किशोर माणिकराव चौधरी (४२, रा. पुसला) याने १५ जून रोजी भाऊ सतीश (३२) याला डोक्यावर वीट मारून जखमी केले. याच प्रकरणात सतीशने सेंट्रिंगची पाटी का काढली, अशी विचारणा करीत मारहाण केल्याचे किशोर चौधरी यांना मारहाण केल्याची तक्रार नमूद आहे. पोलिसांनी भादंविचे कलम ३२४ अन्वये गुन्हा नोंदविला.
-------------