शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मद्यपी डॉक्टराला चोप; रुग्णांच्या नातेवाइकांविरुद्ध गुन्हा, जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 19:18 IST

जिल्हा सामान्य रुग्णालयात मद्यपी डॉक्टरला रुग्णांच्या नातेवाइकांनी चोप दिल्याचा प्रकार रविवारी रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास घडला. कोतवाली पोलिसांनी नेत्रतज्ज्ञ तारासिंह परशराम आडे (४२) यांच्याविरुद्ध कलम ८५ (१), (२) अन्वये गुन्हा नोंदविला.

अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयात मद्यपी डॉक्टरला रुग्णांच्या नातेवाइकांनी चोप दिल्याचा प्रकार रविवारी रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास घडला. कोतवाली पोलिसांनी नेत्रतज्ज्ञ तारासिंह परशराम आडे (४२) यांच्याविरुद्ध कलम ८५ (१), (२) अन्वये गुन्हा नोंदविला. याप्रकरणी आडे यांच्या तक्रारीवरून सोमवारी मारहाण करणा-या युवकांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली आहे. अतिदक्षता विभागातील पेइंग वॉर्डमध्ये रविवारी रात्री नेत्रतज्ज्ञ डॉ. नरेश आडे यांची ड्युटी होती. मद्यधुंद अवस्थेत अतिदक्षता कक्षात पोहोचताच त्यांनी साहित्याची फेकाफेक करून काही जणांना शिवीगाळ केली. तेथे उपस्थित रुग्णांच्या नातेवाइकांनी समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते कोणाचे ऐकून घेतच नव्हते. संतप्त नातेवाइकांनी अखेर डॉ. आडेंना चोप देत निवासी वैद्यकीय अधिकारी सुभाष तितरे यांच्या कक्षापर्यंत नेले. रुग्णालयात दाखल झालेल्या  कोतवाली पोलिसांनी डॉ. आडेंना ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी केली. सुभाष तितरे यांच्या तक्रारीवरून आडेविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.दरम्यान, डॉ. आडेंना मारहाण करणारे स्वप्निल प्रभाकर साव (३०), अनिरुद्ध सुधाकर बोबडे (३३) व पीयूष सुभाष वसू (२८) या युवकांविरुद्ध भादंविचे कलम ३५३, ३३२, ३४ सहकलम वैद्यकीय सेवा व्यक्ती संस्था नुकसानापासून प्रतिबंधक कायदा २०१० च्या कलम ३ अन्वये सोमवारी कोतवाली पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला. त्यांना अटक करण्यात आली आहे. 

डॉ. आडे यांना मद्यपानाची सवय आहे. रविवारी रात्री घडलेल्या प्रकाराचा अहवाल आरोग्य संचालकांकडे पाठविण्यात आला आहे. सद्यस्थितीत त्यांना कामावरून दूर ठेवण्यात आले आहे. - श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक, इर्विन रुग्णालय

इर्विनच्या पेइंग वॉर्डमध्ये ड्युटीवर असणा-या डॉ. आडेंची वैद्यकीय तपासणी करून गुन्हा नोंदविला आहे. डॉ. आडेंच्या तक्रारीवरून मारहाण करणा-या तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे. - दिलीप पाटील, पोलीस निरीक्षक, कोतवाली ठाणे

टॅग्स :Amravatiअमरावती