शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

एएसआयचा मुलगा निघाला दुचाकी चोरांचा साथीदार!

By admin | Updated: January 21, 2016 00:39 IST

शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरु असताना पोलिसांच्या हाती काही दुचाकी चोरटे लागले.

गाडगेनगर पोलिसांची कारवाई : दोन दुचाकी जप्त, तीन घरफोडींचीही कबुलीअमरावती : शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरु असताना पोलिसांच्या हाती काही दुचाकी चोरटे लागले. दोन दिवसांपूर्वी शहर कोतवाली पोलिसांनी अल्पवयीन दुचाकी चोरट्यांना ताब्यात घेऊन पाच दुचाकी जप्त केल्यात. या प्रकरणात मिळालेल्या माहितीवरून बुधवारी गाडगेनगर पोलिसांनीही चार दुचाकी चोरांना अटक केली. त्यांच्याजवळून तीन दुचाकी सुध्दा जप्त केल्यात. या आरोपींमध्ये ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत एका सहायक पोलीस उपनिरीक्षकांच्या मुलाचाही सहभाग आहे. शहरात दुचाकी चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेता पोलीस यंत्रणा डोळ्यात तेल घालून दुचाकी चोरांच्या मागावर होते. दरम्यान राजापेठ व कोतवाली पोलिसांच्या हाती अल्पवयीन दुचाकी चोर लागल्यानंतर आता गाडगेनगर पोलिसांच्या हातीही चार चोर लागले आहेत. पवन प्रवीण पवार (१९,रा. तिरुमाला कॉलनी), गौरव गजानन कांबे ( १९,रा. राठीनगर) व विक्की ढोके (२०,रा. सोनल कॉलनी) हे एका टोळीतील तीन आरोपी असून त्यांना गाडगेनगर पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. तसेच आरोपी अक्षय संजय गवई (२१, जय सियारामनगर) याला बुधवारी अटक केली आहे. यातील पवन प्रवीण पवार हा ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातील एका सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा मुलगा असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. चोरी प्रकरणात गौरव कांबे हा मुख्य आरोपी असून अन्य साथिदारांना सोबत घेऊन तो चोऱ्या करीत होता. या चार आरोपींनी दोन घरफोडी व तीन दुचाकी चोरींची तर अक्षय गवई याने एक दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे. चोरीच्या आणखी दुचाकींची माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. अटक केलेले आरोपी रेकॉर्डवरील असून त्यांना यापूर्वीही अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते. मात्र, तेथून बाहेर आल्यानंतर पुन्हा घरफोडी व दुचाकी चोरीचे सत्र त्यांनी सुरुच ठेवल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. राजापेठ व शहर कोतवाली पोलिसांनी अल्पयीनांजवळून अनुक्रमे तीन व पाच दुचाकी तर गाडगेनगर पोलिसांनी आरोपींकडून तीन दुचाकी जप्त केल्या आहेत. राजापेठ पोलिसांकडून वर्धेतून एक दुचाकी जप्त स्टंटबाजी करणाऱ्या तीन अल्पवयीनांना राजापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तसेच रेकॉर्डवरील आरोपी शुभम बद्रे यालाही अटक केली आहे. या आरोपींची चौकशी सुरु केली असता त्यांनी चोरीच्या पैशातून दुचाकी खरेदी केल्याचे उघड झाले होते. तीन अल्पवयीनांना नोटीस बजावून पालकांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. मंगळवारी रात्री वर्धा शहरात एका अल्पवयीन आरोपीला दुचाकीसह पकडण्यात आले. तो अल्पवयीन अमरावतीचा रहिवासी आहे. सहा महिन्यांपूर्वी राजापेठ पोलिसांनी त्या अल्पवयीनाला ताब्यात घेतले होते. वर्धा पोलिसांनी पकडलेली दुचाकी राजापेठ पोलिसांनी जप्त केली. कोतवाली पोलिसांकडून अल्पवयीनांची चौकशीशहर कोतवाली पोलिसांनी सात अल्पवयीनांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील पाच दुचाकी जप्त केल्या होत्या. अल्पवयीनांचा शेगाव नाक्यावर अपघात झाल्यानंतर दुचाकी चोरीचा पर्दाफाश झाला होता. अपघातानंतर एक आरोपी घटनास्थळावरून पसार झाला . त्याचा शोध घेऊन पोलिसांनी दुचाकी व घरफोडीचोरांची टोळी गजाआड केली आहे. शहर कोतवाली पोलिसांनी पकडलेल्या अल्पवयीनांची पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कडू यांनी चौकशी केली असून त्यांना पालकांच्या स्वाधिन केले आहे.