शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

वैमानिक प्रशिक्षणासाठी विमानतळाची चाचपणी

By admin | Updated: October 5, 2016 00:19 IST

अमेरिकन कंपनीची भागिदारी असलेल्या सीएई आॅक्सफोर्ड एव्हिअ‍ेशन अ‍ॅकेडमीने बेलोरा विमानतळ येथून वैमानिक प्रशिक्षण सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे.

शासनाकडे प्रस्ताव : सीएई आॅक्सफोर्ड एव्हिएशन अकॅडमीच्या चमूचे सर्वेक्षणअमरावती : अमेरिकन कंपनीची भागिदारी असलेल्या सीएई आॅक्सफोर्ड एव्हिअ‍ेशन अ‍ॅकेडमीने बेलोरा विमानतळ येथून वैमानिक प्रशिक्षण सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. त्याअनुषंगाने शनिवारी चमुने बेलोरा विमानतळाची चाचपणी केली असून तसा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविला आहे. वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू होणे ही बाब स्थानिकांना रोजगार निर्मितीसाठी पूरक ठरेल.विमानतळाच्या विस्तारीकरणात अडथळा ठरणारा जळू ते बेलोरा हा ३.८० कि.मी. वळण मार्ग निर्मितीच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत. आठ दिवसांत वळण रस्ता निर्मितीच्या कामाला प्रारंभ होईल, असे संकेत सूत्रांकडून मिळाले आहे. बेलोरा विमानतळ येथून वैमानिक प्रशिक्षण सुरु करण्याचा नवा प्रस्ताव आल्यामुळे रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी सामान्य प्रशासन विभाग कामी लागला आहे. शनिवारी बेलोरा विमानतळाचे सर्वेक्षण सीएई आॅक्सफोर्ड एव्हिअ‍ेशन अ‍ॅकेडमीचे विजय अहिरे, बेलोरा प्रबंधक एम.पी. पाठक आदींच्या नेतृत्वात करण्यात आले. गोंदिया येथे वैमानिक प्रशिक्षणासाठी जागा अपुरी असल्याने सोईच्या विमानतळावरून प्रशिक्षण देण्याचा निर्णय सीएई आॅक्सफोर्ड एव्हिअ‍ेशन अ‍ॅकेडमीने घेतला. बेलोरा विमानतळ हे वैमानिक प्रशिक्षणासाठी अतिशय सोयीचे असल्याचे मत सर्वेक्षणाअंती चमुने व्यक्त केले आहे. बेलोरा विमानतळाहून वैमानिक प्रशिक्षण देण्याची परवानगी मिळावी, यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीक डे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. १८ महिने कालावधीचे प्रशिक्षण वैमानिकांना मिळणार आहे.‘‘ बेलोरा विमानतळाहून वैमानिक प्रशिक्षण देणाऱ्या चमुने भेट घेतली आहे. वैमानिक प्रशिक्षणामुळे स्थानिकांना रोजगाराचे साधन उपलब्ध होणार आहे. ही बाब अमरावती जिल्ह्यासाठी अतिशय सुखद ठरणारी आहे. - सुनील देशमुख,आमदार, अमरावती