अमरावती : चंद्रपूरनजिक रेल्वे मार्गावर शुक्रवारी मध्यरात्री मालगाडीचे १८ डबे घसरल्याने रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला असून मध्य रेल्वे भुसावळ विभागांतर्गत अहमदाबाद- चेन्नई नवजीवन एक्स्प्रेस या गाडीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. ही गाडी भुसावळहून मनमाड, दौंड, वाडी या मार्गे ही नवजीवन एक्सप्रेस धावणार आहे. तसेच विशाखापट्टणम गांधीधाम एक्सप्रेस ही निजामाबाद, मुदखेड, नांदेड, अकोला मार्गे वळविण्यात आली आहे. विहिरगाव येथे मालगाडी घसरल्यामुळे एकूण २५ गाड्यांचे मार्ग बदलविण्यात आले आहे. अपघातस्थळी दोन्हीकडील वाहतूक विस्कळीत झाली असून हा मार्ग सुरळीत होण्यास किमान दोन दिवस लागणार असल्याची माहिती रेल्वे सहायक वाणिज्य प्रबंधकांनी दिली.
अहमदाबाद- चेन्नई एक्स्प्रेसच्या मार्गात बदल
By admin | Updated: January 7, 2017 00:16 IST