शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

कोरडवाहू अभियानांतर्गत शेती विकास

By admin | Updated: June 2, 2014 00:39 IST

एकूण पिकाखालील क्षेत्रापैकी ८0 टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे.

एकूण पिकाखालील क्षेत्रापैकी ८0 टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. या क्षेत्रामधील पिकाच्या उपलब्धतेमध्ये पावसाच्या चढ-उतारामुळे उत्पादकतेवर परिणाम होतो. कोरडवाहू क्षेत्रात पडणारा पाऊस आणि उपलब्ध स्थानिक संसाधनाचे योग्य पद्धतीने नियोजन केल्यास तसेच या भागातील शेतकर्‍यांना विविध पीक पद्धती आणि शेती पूरक व्यवसायाची सांगड घातल्यास विकास होऊ शकतो. यासाठी शासनाने स्वतंत्र निधीची तरतूद करून कोरडवाहू शेती अभियान सुरू केले आहे.

या योजनेंतर्गत जिल्ह्यामधील १३ गावांचा समावेश आहे. यासाठी शासनाने यावर्षी ९७.७२ कोटी रूपयांची तरतूद केली आहे. कोरडवाहू शेती अभियान अंतर्गत मनुष्यबळ विकास, संरक्षित सिंचन सुविधा, यांत्रिकीकरण, कोरडवाहू पिकांच्या सुधारित वाणाची प्रात्यक्षिके, संरक्षित शेती, प्राथमिक कृषी प्रक्रिया व पणन इत्यादी घटकांचा वापर करून सन २0१४-१५ ते २0१८-१९ या कालावधीत २0,000 कोटींचा कार्यक्रम राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तसेच या आर्थिक वर्षासाठी ९५.७२ कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहे. सन २0१४-१५ या वर्षात राज्यामधील ४0३ गावांत हे कोरडवाहू शेती अभियान राबविण्यात येत आहे.

सिंचनाच्या अत्यंत सीमित सुविधा, अवर्षणप्रवण क्षेत्राची, अवनत जमिनीची, हलक्या जमिनीची व्याप्ती ही पिकांच्या कमी उत्पादकतेचे प्रमुख कारण आहेत. त्यामुळे राज्यातील कोरडवाहू शेती ही अत्यंत जिकरीची व जोखमीची झालेली आहे. या शेतीचा कायमस्वरुपी विकास करून कृषी उत्पादनात सातत्य व स्थिरता आणणे हे राज्य शासनाचे धोरण आहे.

राज्यात पडणार्‍या पावसाचे विषम प्रमाण तसेच पिकांच्या वाढीच्या काळात दरवर्षी राज्यात कोठे ना कोठे पावसात प्रदीर्घ खंड पडून दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असल्याने राज्याच्या कृषी उत्पादनात सातत्य दिसून येत नाही. या कारणास्तव राज्य शासनाने कोरडवाहू शेतीच्या विकासाला प्राधान्य देण्याचे धोरण स्वीकारले आहे.

या अभियानांतर्गत मातीमधील अन्नांशाचे प्रमाण तपासून व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार खातांची मात्रा देण्यात येते. याकरिता पीक प्रात्यक्षिक संख्येच्या प्रमाणात मृद नमुने तपासणी करण्यासाठी शेतकर्‍यांना प्रोत्साहित करण्यात येते. जेणेकरुन शेतातील पिकांच्या उत्पन्नात वाढ व्हावी व जमिनीचे आरोग्य चांगले रहावे.