शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

कृषी योजनांना आता ‘मिशन मोड’ची झळाळी

By admin | Updated: May 29, 2014 23:30 IST

शेतकर्‍यांसाठी केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणार्‍या कृषी विभागाच्या सर्वच योजनांमध्ये बदल होणार आहे. मिशम मोडच्या माध्यमातून योजनांमध्ये नवे तंत्रज्ञान जोडून त्या नव्या स्वरुपात

अमरावती : शेतकर्‍यांसाठी केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणार्‍या कृषी विभागाच्या सर्वच योजनांमध्ये बदल होणार आहे. मिशम मोडच्या माध्यमातून योजनांमध्ये नवे तंत्रज्ञान जोडून त्या नव्या स्वरुपात शेतकर्‍यांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषी विभागात वरिष्ठ पातळीवर नवे धोरण ठरविण्यात येणार आहे. शेतीला शेतीपुरक व्यवसायाची जोड असावी, यासाठी शासनस्तरावर नेहमीच प्रयत्न केले जातात. याकरिता नव्या-नव्या संकल्पनाही कृषी विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येतात. याच पार्श्‍वभूमीवर सध्या राज्यभरात जिल्हा परिषद, कृषी विभाग आणि राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकर्‍यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. मात्र, याच योजनांमध्ये नवे तंत्रज्ञान जोडून बदल केले जाणार आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या जिल्हा परिषद, कृषी विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणार्‍या अनुसूचित जाती उपाययोजना, आदिवासी उपयोजना, कृषी यांत्रिकीकरण योजना आदी योजना जिल्हा परिषद कृषी विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येतात. मात्र याच जुन्या योजनांना नवी झळाळी देऊन आता या योजना नव्या स्वरुपात राबविण्यात येणार आहेत. शेतकर्‍यांसाठी राबविल्या जाणार्‍या योजनांना तंत्रज्ञानाची जोड मिळणार असल्याने या योजना अधिक पारदर्शकपणे राबविता येणे शक्य होणार आहे.