शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

इतवारा बाजार परिसरात अग्नितांडव

By admin | Updated: May 29, 2014 01:30 IST

गजबजलेला चौक म्हणून ओळख असलेल्या स्थानिक इतवारा बाजार परिसरातील फळ मार्केमध्ये बुधवारी पहाटे ४ वाजता अचानक आग लागली. या

अमरावती : गजबजलेला चौक म्हणून ओळख असलेल्या स्थानिक इतवारा बाजार परिसरातील फळ मार्केमध्ये बुधवारी पहाटे ४ वाजता अचानक आग लागली. या आगीत सुमारे ४८ फळ विक्रीच्या दुकानांची राखरांगोळी झाली आहे. यामध्ये व्यापार्‍यांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने या भीषण आगीत जिवीत हानी टळली.

इतवारा बाजारात परिसरातील मुर्गी गल्लीत फळ विक्रीचे होलसेल मार्केट आहे. तेथे हापुस आंबा, टरबुज, खरबुज, अननस, अंगुर इत्यादी फळांची होलसेल विक्री केली जाते. या मार्केटमधील फळ विक्रीच्या दुकानांना बुधवारी पहाटे ४ वाजता अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रुप धारण केल्याने ही आग सर्वत्र पसरुन तेथे मोठा अग्नितांडव सुरु झाला. परिसरात पहाटे फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांचे याकडे लक्ष जाताच त्यांनी घटनेची माहिती शहर कोतवाली पोलिसांना दिली. शहर कोतवालीचे पोलीस निरीक्षक विजय साळुंखे यांनी कर्मचार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली. तेथे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी १८ बंबाच्या साहायाने तब्बल तीन तासाने आगीवर नियंत्रण मिळविले. तो पर्यंत सुमारे ४८ दुकानांची राखरांगोळी होऊन करोडो रुपयांचे नुकसान झाले.

हापूस आंबा जळून खाक

भीषण अग्नितांडवात फळ मार्केटमधील दुकानातील संपुर्ण साहित्य व फळे जळून खाक झाली. यामध्ये शेख शकील यांच्या दुकानातील सुमारे दोन लाख रुपये किमतीच्या हापुस आंब्यासह प्लास्टिकचे कॅरेट जळून खाक झाले. शेख शकीलचे आगीत सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती तेथील काही प्रत्यक्षदश्री व्यापार्‍यांनी दिली.

३0 हातगाड्यांची राखरांगोळी

इतवारा बाजार परिसरातील फळ मार्केटमध्ये लागलेल्या भीषण आगीत दुकानांसह तेथे ठेवलेल्या काही विक्रेत्यांच्या जवळपास तीस हातगाड्यांचीही राखरांगोळी झाल्याची माहिती तेथील नागरिकांनी दिली.

अग्निशमन दलाविरुध्द रोष

फळ मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची माहिती व्यापार्‍यांना मिळताच व्यापार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी त्यांनी अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांना दुरध्वनीवर कळविले. परंतु वाहन चालक उपलब्ध नाही अशी कारणे देऊन कर्मचार्‍यांनी पुर्वी घटनास्थळी पोहचण्यास नकार दिला. अखेर काही संतप्त व्यापार्‍यांनी अग्निशमन दलाच्या कार्यालयावर धाव घेतल्याने अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली, असा आरोप करुन व्यापार्‍यांनी संताप व्यक्त केला.