शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनकर्त्यांना जबरीने कोंबले पोलीस व्हॅनमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 22:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : नांदगाव पेठ टोलनाक्यावर टोलमुक्तीसाठी रास्तारोको करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी जबरीने पोलीस व्हॅनमध्ये टाकले. पोलिसांनी २५ ...

ठळक मुद्दे२५ ते ३० जण 'डिटेन' : रास्ता रोकोनंतर पोलिसांची कारवाईटोलमुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नांदगाव पेठ टोलनाक्यावर टोलमुक्तीसाठी रास्तारोको करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी जबरीने पोलीस व्हॅनमध्ये टाकले. पोलिसांनी २५ ते ३० कार्यकर्त्यांना 'डिटेन' करून पोलीस विभागाच्या वसंत हॉलमध्ये नेले होते.अमरावतीवरून मोर्शीकडे जाणाºया वाहनांना केवळ पाच किलोमीटर अंतरासाठी टोल आकारण्यात येत असल्याच्या विरोधात मोर्शी-वरूड टोलमुक्ती समितीने आंदोलन छेडले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून टोलमुक्तीसाठी समिती प्रयत्नरत असून, शासन व लोकप्रतिनिधी स्तरावर समितीने निवेदन देऊन टोलमुक्तीसाठी अथक परिश्रम घेतले. दरम्यान, टोलमुक्ती आंदोलनात विदर्भ आॅटोचालक फेडरेशनचे संस्थापक नितीन मोहोड व अमरावती ट्रान्सपोर्ट एजन्ट असोशिएशनेही उडी घेतली. यासोबत काही राजकीय पक्षानेही या आंदोलनाला पाठिंबा दिला. दरम्यान, १९ नोव्हेंबर रोजी टोलमुक्तीसाठी आरपार लढा देऊ, अशी घोषणा टोलमुक्तीसह अन्य संघटनांनी दिली. त्यानुसार सोमवारी सर्व पक्षीय कार्यकर्ते व पदाधिकारी नांदगाव पेठ टोलनाक्यावर एकत्रित आले. हातात शासना विरोधातील फलके घेऊन आंदोलनकर्त्याने तीव्र घोषणाबाजी सुरु करून टोलनाक्यावरील वाहने अडविले. साखळी श्रुंखला करून रास्ता रोको करून रस्त्यावरच ठिय्या मांडला. त्यामुळे काही वेळापर्यंत टोलनाक्यावरील वाहतूक ठप्प झाली. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आला होता.पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना घेराव घालून आंदोलनासाठी मज्जाव केला. मात्र, आंदोलनकर्ते आक्रमक होण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना उचलून पोलीस व्हॅनमध्ये जबरीने टाकले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी रोष व्यक्त केला. मात्र, पोलीसी खाक्यासमोर आंदोलनकर्त्यांचा आवाज दाबण्यात आला. या आंदोलनात मोर्शी वरूड येथील विशाल तिजारे, भैय्या साबळे, निलेश गनथडे, बाळासाहेब बोहरपी, जितू बुरंगे, रवि यावलकर, आपा गेडाम, अजीज पठाण, नितीन उमाळे, नाना देशमुख, मनीष चौधरी, संजय पांडव, विक्रम ठाकरे, विजय श्रीराव, धनंजय बोकडे, दिलीप कोहळे, नितीन पन्नासे, नईम खान, नितीन मोहोड, सागर ठाकरे, आशीष टाकोडे आदी उपस्थित होते.नितीन मोहोड, प्रदीप बाजडसह शेकडो कार्यकर्ते 'डिटेन'आंदोलनकर्त्यांमधील नितीन मोहोड, प्रदीप बाजड यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शासनाविरोधात नारेबाजी केली. गडकरी झोपले आहे का, आमदार खासदारांचा निषेध असो, डॉ. बोंडेविरुद्ध नारेबाजी करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. दरम्यान पोलिसांनी रास्ता रोको व नारेबारी करणाऱ्या नितीन मोहोड, प्रदीप बाजड यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना 'डिटेन' केले.राष्ट्रवादीही उतरली टोलमुक्तीसाठीटोल मुक्तीच्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन देशमुख,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू महल्ले, माजी स्थायी सभापती अविनाश मार्डीकर, गुडडु धमार्ळे कार्याध्यक्ष शहर राष्ट्रवादी काँग्रेस, धीरज श्रीवास नितीन देशमुख, गुड्डू ढोरे, अभिजित धर्माळे आदी सहभागी झाले होते.