शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

एका आंदोलनकर्त्याची प्रकृती बिघडली

By admin | Updated: February 5, 2016 00:16 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील शारीरिक शिक्षण विभागप्रमुख सच्चीदानंद बेहरांच्या विरोधात ...

उपोषणाचा तिसरा दिवस : इर्विनमध्ये दाखलअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील शारीरिक शिक्षण विभागप्रमुख सच्चीदानंद बेहरांच्या विरोधात एनएसयूआयने सुरू केलेल्या आंदोलनादरम्यान गुरुवारी तुलसी खरडोंग या उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडली. त्याला उपचाराकरिता इर्विन रुग्णालयात दाखल केले होते. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशीही विद्यापीठ प्रशासनाकडून दखल घेण्यात आली नाही. मंगळवारीपासून विद्यार्थ्यांनी संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोरच उपोषणाला सुरुवात केली. शारीरिक शिक्षण विभागप्रमुख सच्चीदानंद बेहरा काही विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याचा आरोप एनएसयूआयने केला आहे. बेहरा यांना पदावरून हटवा, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, तसेच शारीरिक शिक्षण विभागाने शोंधप्रबंध सक्तीचे करू नये, ते एच्छिक असावे, अशा विविध मागण्या केल्या आहेत. मागण्यांच्या पूर्ततेसाठी एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष अक्षय भुयार यांच्या नेतृत्वात हिमांशू कुबडे, तुलसी खरडोंग, उमर जान शाह, मुजीद हुसेन मल्लीक, आरजीत हुसेन वार, रुगवेद सरोदे, केतन बारबुध्दे, नितीन ठाकरे उपोषणाला बसले आहेत. त्यातच बेहरा यांच्या चौकशीचा अहवाल सुध्दा गुलदस्त्यात असल्याचे दिसून आले आहे. राज्याचे वित्त व नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंट्टीवार गुरुवारी अमरावती दौऱ्यावर आले होते. शासकीय विश्रामगृहात कार्यकर्त्यांनी त्यांना निवेदन सोपविले. कुलगुरु खेडकर व विभागप्रमुख सच्चीदानंद बेहरा यांच्याविरोधात हे निवेदन होते.चौकशी अहवाल कुलगुरुपर्यंत पोहचला नाहीशारीरिक शिक्षण विभागप्रमुख बेहरा यांची विद्यापीठ प्रशासनाने नेमलेल्या समितीकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे. समितीतील अधिष्ठाता एस. आर. माणिक यांनी काही विद्यार्थ्यांचे बयाण नोंदविले असून तो चौकशी अहवाल कुलगुरुंसमोर सादर करण्यात येणार होता. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो अहवाल कुलगुरुंसमक्ष सादर करण्यात आला नाही. त्यामुळे विद्यार्थी निर्णयाच्या प्रतीक्षेत होते.