शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

दापोरी येथे शेतकºयांचा चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 22:27 IST

मोर्शी तालुक्यातील शेतकºयांनी विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी दापोरी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात गुरुवारी उत्स्फूर्त चक्काजाम आंदोलन केले.

ठळक मुद्देवीज कापली : ‘स्वाभिमानी’चे नेतृत्व; १५ दिवसांत गारपीटग्रस्तांना अनुदान

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : मोर्शी तालुक्यातील शेतकºयांनी विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी दापोरी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात गुरुवारी उत्स्फूर्त चक्काजाम आंदोलन केले. तहसीलदार अनिरुद्ध बक्षी यांनी गारपीटग्रस्तांच्या खात्यात १५ दिवसांत संत्रा नुकसानभरपाई जमा करण्याचे आश्वासन दिले. आंदोलनात सहभागी झालेल्या सुमारे २५० कार्यकर्त्यांनी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.शेतकºयांची कृषिपंपाची वीज जोडणी ऐन हंगामात कापल्यामुळे त्यांच्यापुढे नवे संकट उभे ठाकले आहे. महावितरणने वीजबिल वसुलीसाठी अन्यायकारक पवित्रा उचलला आहे. वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी कृषिपंपाची बिले देऊन नोटीस पाठवणे आवश्यक होते. शेतकºयांना मात्र अजूनही वीज बिल अजूनही मिळाले नाही. त्याशिवाय तालुक्यात फेब्रुवारी २०१६ मध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे उद्ध्वस्त झालेल्या संत्र्याच्या शेतीसाठी केंद्र सरकारने विशेष पॅकेज जाहीर केले. ८०० शेतकरी या मदतीपासून वंचित आहेत. त्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष देवेंद्र भुयार यांच्या नेतृत्वात मोर्शीपासून आठ किमी अंतरावरील दापोरी येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. त्याला तालुक्यातील शेतकºयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी मोर्शी-वरूड मार्गावर सुमारे ३५ बैलबंड्या लावून वाहतूक अडविण्यात आली होती. या ठिकाणी मोर्शी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता.शेतकºयांचे म्हणणे ऐकण्यासाठी तहसीलदार अनिरुद्ध बक्षी आंदोलनस्थळी आले. १५ दिवसांत गारपीटग्रस्त शेतकºयांच्या खात्यात अनुदान जमा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यानंतर चक्काजाम आंदोलन स्थगित करण्यात आले. वीज जोडणी कापण्याची मोहीम थांबवावी, पीक विमा काढलेल्या शेतकºयांना नुकसानभरपाई, गारपीटग्रस्त शेतकºयांना तात्काळ मदत आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार बक्षी यांना देण्यात आले.आंदोलक शेतकºयांवर गुन्हेचक्काजाम आंदोलन करणाºया आंदोलक शेतकºयांवर कलम १३५ मु.पो.का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये देवेंद्र भुयार, नितीन ढोमणे, आशिष वानखडे, अमोल महल्ले, रवींद्र पाटील, हर्षल राऊत, स्वप्निल राऊत, ऋषीकेश राऊत, सुनील गुलाबराव केचे, प्रशांत विश्वास पन्नासे, राहुल भाकरे, महेश उदासी, रोशन भोरगडे यांच्यासह सुमारे २५० कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत.