शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

चारघड प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:10 IST

खोपडा येथील निम्न चारघड प्रकल्पामध्ये झालेल्या गैरप्रकाराची चौकशी, बुडीत क्षेत्राकरिता संपादित करण्यात आलेल्या घरांचे पुनसर्वेक्षण आणि वाढीव मोबदला या प्रमुख मागण्यांसाठी आरंभलेले बेमुदत उपोषण तीव्र करण्यात आले आहे. आंदोलकांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देआत्मदहनाचा इशारा : आंदोलकांचा आकडा पाचशेवर

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : खोपडा येथील निम्न चारघड प्रकल्पामध्ये झालेल्या गैरप्रकाराची चौकशी, बुडीत क्षेत्राकरिता संपादित करण्यात आलेल्या घरांचे पुनसर्वेक्षण आणि वाढीव मोबदला या प्रमुख मागण्यांसाठी आरंभलेले बेमुदत उपोषण तीव्र करण्यात आले आहे. आंदोलकांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी प्रशासनाच्यावतीने कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने मंगळवारी खोपडा येथील पंडित भोजने, दिलीप कोठाळे, प्रकाश कुरवाळे, विलास मेश्राम, गणेश नाखले, अरुण लुंगे व सुधाकर अमझरे या सात प्रकल्पग्रस्तांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला. आंदोलनात सहभागी महिलांनी टाळ-मृदंगावर भजन आंदोलन सुरू केले. वरूड पंचायत समितीचे सभापती विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्वातील या आंदोलनात २६ फेब्रुवारी रोजी सुमारे ५०० महिला-पुरुष सहभागी झालेत. मोर्शी येथील उपविभागीय अधिकारी मनोहर कडू यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन ठाकरे यांच्याशी चर्चा केली.खोपडा येथील गावठाण निम्न चारघड प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राकरिता संपादित करण्यात आलेल्या घरांची संयुक्त मोजणी भूसंपादन अधिकाऱ्यांनी केली असता, २०१४ मध्ये घरांची संख्या ४९८, तर २०१८ मध्ये ५१६ इतकी दाखविण्यात आली. सन २०१४ च्या संयुक्त मोजणी अहवालानुसार घराच्या बांधकामासहीत क्षेत्र हे वेगळे असून, २०१८ च्या नोटीसमध्ये जास्त दाखविण्यात येऊन मूल्यांकन वाढविण्यात आले. या सर्व प्रकाराला ग्रामसचिव, ग्रामपंचायत सदस्य जबाबदार असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांपुढे झालेला गैरप्रकार पुराव्यासहित सादर केला. मात्र, त्यावर कोणत्याही प्रकारची चौकशी करण्यात आली नाही. तरी खोपडा गावाचा निवाडा करताना झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात येऊन जुन्या संयुक्त मोजणी अहवालानुसार निवाडा पारित करण्यात यावा तसेच नवीन भूसंपादन कायद्यानुसार गुणांक २ लावून चारपट मोबदला देण्यात यावा, अन्यथा न्याय मिळेपर्यंत हे उपोषण सुरूच राहील, असा निर्धार प्रकल्पग्रस्तांचा आहे. खोपडा येथील मोठा जनसमुदाय उपोषणाला बसल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले.