शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

शंकर महाराजांच्या अटकेसाठी आक्रमक मोर्चा

By admin | Updated: September 4, 2016 00:08 IST

प्रथमेश नरबळी प्रकरणातील मुख्य सूत्रधार शंकर महाराजांना २४ तासांत अटक करण्याच्या आग्रही मागणीसाठी...

२४ तासांचा अल्टिमेटम् : भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ निदर्शनेअमरावती : प्रथमेश नरबळी प्रकरणातील मुख्य सूत्रधार शंकर महाराजांना २४ तासांत अटक करण्याच्या आग्रही मागणीसाठी मांतग समाज बांधवासह सामाजिक संघटनांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. संतप्त मोर्चेकऱ्यांनी तब्बल तीन तास भर पावसात ठिय्या देऊन शंकर महाराजांविरुद्ध आक्रमक भाषणे दिलीत. लहूजी शक्तीसेना आणि विविध सामाजिक संघटनांनी शनिवारी महामोर्चाची हाक दिली होती. त्यानुसार दुपारी १ वाजताच्या सुमारास राजकमल चौकातून निघालेला हा मोर्चा २.३० वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहचला. मात्र, आधीच उपस्थित असलेल्या सशस्त्र पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अलीकडेच रोखले. त्यामुळे मोर्चेकऱ्यांनी रस्त्यावरच ठिय्या देऊन निदर्शने केली. ‘शंकर महाराज के समर्थको को, जुते मारो सालो को’ अशा गगनभेदी घोषणांनी मोर्चेकरांनी निषेध सभेला सुरुवात केली. श्रध्देच्या नावावर बुवाबाजी करणाऱ्या शंकर महाराजांच्या संस्थेत मांतग समाजाच्या विद्यार्थ्याचा खून करण्याचा अघोरी प्रयत्न करण्यात आला. 'लोकमत'ने या प्रकरणाला वाचा फोडली. शंकर महाराजांच्या अखत्यारीतील आश्रम शाळेमध्ये नरबळीचे कट कारस्थान रचले गेले. मात्र, अद्यापपही या कटाचे सुत्रधार असलेले शंकर महाराज यांना अटक झालेली नाही. शंकर महाराजांच्या सारख्या भोंदू महाराजाला तातडीने अटक करावी, त्यांची नार्को टेस्ट करावी आणि सोबतच आश्रमाच्या, संस्थेच्या संपत्तीची सिआयडीकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मोर्चाचे संयोजक दादासाहेब क्षीरसागर, राजाभाऊ हातागडे, गणेशदास गायकवाड, रुपेश खडसे, उमेश भुजाडणे, प्रकाश वाळसे, विजय गायकवाड आदिंनी केली. मोर्चेकरांना रोखण्यासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. ऊन पावसाच्या खेळात या मोर्चेकऱ्यांनी प्रथमेशला न्याय मिळून देण्यासाठी आक्रमक भूमिका मांडली. २४ तासांत शंकर महाराजांना अटक झाली नाही, तर आश्रमात शिरून कुलुप लावण्याचा सनसणीत इशारा देण्यात आला. मोर्चात अजयही सहभागीअमरावती : प्रथमेश सगणे या ११ वर्षीय बालकाचा गळा चिरण्यात आला. तत्पूर्वी नरबळी देण्याच्या प्रयत्नात अजय वणवे याचा चेहरा दगडाने ठेचण्यात आला होता. तो अजय शनिवारी महामोर्चात सहभागी झाला होता. मांतग समाज बांधवांनी त्याला या मोर्चात सहभागी करून घेतले होते. गावागावांत पोलखोल करूशंकर महाराज आणि त्यांच्या समर्थकांना सहानुभूतीची गरज नाही. शंकर महाराजांची नार्को टेस्ट झालीच पाहिजे. महाराजांची सिध्दी खोटी आहे, त्यांची आणि आश्रमांची गावागावात जाऊन पोलखोल करण्याचा इशारा क्रांती ज्योती ब्रिगेडचे नंदेश अंबाडकर यांनी दिला. मोर्चात यांचा सहभागमोर्चाचे आयोजक व प्रमुख सहभागात पंकज जाधव, किशोर वाघमारे, गणेश कलाने, गोपाळ हिवराळे, जनार्दन लोखंडे, दिलीप प्रधान, विजय चव्हाण, अमोल थोरात, रामा वाळसे, अमोल वानखडे, कैलास राऊत, मनोज गवळी, विनोद वाघमारे, नाना खंडारे, शालीग्राम वानखडे, हरिनारायण भैसने, हरिभाऊ झोंबाडे, विष्णु घोडे, राम खंडारे, देवीदास वानखडे, सुनील संतापे, रणजित पोटपोडे, धनराज वानखडे, सुभाष भोकरे, संजय गाडेकर, संजय वाघमारे, मनोहर इंगोले, मनोज कांबळे, संदीप खडसे, अवधुत वानखडे, दिलीप काळे, रमेश अवचारे, गणेश खंडारे, विश्वास कांबळे, सुरेश ठोंबरे, रामकृष्ण गालफाडे, प्रल्हाद खडसे, सुरेश तिरळे, उत्तमराव भैसने, दादासाहेब क्षीरसागर, राजा हातागडे, गणेशदास गायकवाड, सुरेश स्वर्गे,. मेजर महादेव खंडारे, विजय जोंधळेकर, रुपेश खडसे, शहिर धम्मा खडसे, सुनिल घटाळे, बबन इंगोले, प्रभाकर वाळसे, देवानंद वानखडे, सुधाकर खडसे, प्रकाश वाळसे, विजय गायकवाड, प्रमोद खंडारे, उमेश भुजाळणे,बबलू तायडे, रविकुमार वानखडे यांच्यासह शेकडो समाजबांधव सहभागी झाले. (प्रतिनिधी)'लोकमत'चे अभिनंदनप्रथमेशला न्याय मिळवून देण्यासाठी 'लोकमत'ने घेतलेल्या पुढाकाराचा वारंवार उल्लेख करुन मोर्चेकऱ्यांनी 'लोकमत'च्या अभिनंदनाचे नारे लावलेत. सुमारे तीन ते साडेतीन तासांच्या या मोर्चात सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि वक्त्यांनी 'लोकमत'चे आभार मानलेत. वास्तवदर्शी पत्रकारिता करुन 'लोकमत'ने वंचितांना न्याय मिळवून दिल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केली.आश्रमात किडनी तस्करी ?मुंबईच्या एका खासगी रुग्णालयातील आठ डॉक्टरांना ज्यावेळी किडनी रॅकेटमध्ये अटक करण्यात आली. नेमक्या त्याच कालावधीत पिंपळखुट्यात नरबळीच्या प्रयत्नाचे प्रकार उघड झाले. त्यामुळे शंकर महाराजांच्या आश्रमात मुलांच्या किडन्या काढून त्यांची विक्री केली जात नसेल, असे कशावरून, असा सवाल माजी आमदार पांडुरंग ढोले यांनी उपस्थित केला. महाराजांजवळ जर सिध्दी असेल, तर त्यांना प्रथमेश आणि अजयवरील हल्ल्याची पूर्व कल्पना का आली नाही, असा सवाल त्यांनी केला. शंकर महाराज जर खरेच सोज्वळ व्यक्तिमत्त्वाचे आहेत, तर त्यांनी आश्रमातील या दोन्ही प्रकरणात पोलिसांकडून माहिती का लपविली, असा सवाल करून २००८ मध्ये या परिसरात तीन ट्रक सागाचे चोरीचे लाकूड पकडण्यात आले होते. २०११-१२ मध्ये आश्रमातून पळून गेलेला मुलगा थेट दिल्लीत आढळला, अशी काही उदाहरणे जाहीर करून ढोले यांनी शंकर महाराजांसह त्यांच्या संपूर्ण आश्रमाची आणि नरबळी प्रकरणाची सीआयडीमार्फतच चौकशी करण्यात यावी, अशी आग्रही मागणी केली. अन्यथा आश्रमात कूच'लोकमत'ने नरबळी प्रकरणाचा पर्दाफाश केल्यामुळे शंकर महाराजांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. शंकर महाराज आणि त्यांच्या समर्थकांमध्ये हिम्मत असेल, तर त्यांनी माध्यमांसमोर येऊन आपली बाजू मांडावी, असे आवाहन युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश मारोडकर यांनी दिले. मोर्चेकरांना संबोधित करताना त्यांनी आश्रमात काळे धन असल्याचा गौप्यस्फोट केला.पोलिसांना बांगड्या घालू२४ तासांच्या आत शंकर महाराजांना अटक करावी, अन्यथा आम्ही महिला पोलिसांना बांगड्या घातल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवानी मेश्राम या तरुण कार्यकर्तीने दिला. टाळ्यांच्या कडकडाटात या इशाऱ्याला दाद मिळाली. त्याचवेळी आता बांगड्या भरून चालणार नाहीत, तर आश्रमाला आता कुलूपच ठोकू, असा खणखणीत इशारा वाशीमच्या रोहिणी खंडारे यांनी दिला. शंकर महाराजांना कशाला हव्यात संस्था? कशाला हवी संपत्ती, असा सवाल करून कुठे लपणार? कुठपर्यंत लपणार? आम्ही शंकर महाराजाला शोधूनच काढू, असा इरादाही त्यांनी जाहीर केला.