शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तेलाच्या पुनर्वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासन नेमणार एजंसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 22:54 IST

तेलाचा वारंवार पुनर्वापर हा आता नियमानुसार नियमबाह्य ठरतो. त्यानुसार भारतीय फूड सेफ्टी स्टँडर्ड अथॉरिटीच्या सूचनेवरून शासनाने त्यावर १ मार्चपासून निर्बंधही आणला आहे. हॉटेलमध्ये तेलाचे पुनर्वापर झाले किंवा नाही, त्याची गुणवत्ता तपासण्यासाठी व त्यावर प्रक्रिया करण्यासाठी केंद्र शासन एक अधिकृत एजंसी नेमण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती अन्न व प्रशासन विभागाचे सहआयुक्त सुरेश अन्नपुरे यांनी दिली.

ठळक मुद्देकारवाईकरिता पथक : हॉटेलच्या तपासण्या होणार, सहआयुक्तांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तेलाचा वारंवार पुनर्वापर हा आता नियमानुसार नियमबाह्य ठरतो. त्यानुसार भारतीय फूड सेफ्टी स्टँडर्ड अथॉरिटीच्या सूचनेवरून शासनाने त्यावर १ मार्चपासून निर्बंधही आणला आहे. हॉटेलमध्ये तेलाचे पुनर्वापर झाले किंवा नाही, त्याची गुणवत्ता तपासण्यासाठी व त्यावर प्रक्रिया करण्यासाठी केंद्र शासन एक अधिकृत एजंसी नेमण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती अन्न व प्रशासन विभागाचे सहआयुक्त सुरेश अन्नपुरे यांनी दिली.शहरात खाद्यपदार्थ तळण्याकररिता खाद्यतेलाचा सर्रास पुनर्वापर केला जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच यासंदर्भाची दखल एफडीएच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी घेतली आहे. शासनाची जी काही गाइडलाइन आहे, त्यासंदर्भाची माहिती नोंदणीकृत व्यावसायिक व परवानाधारक हॉटेल्स चालकांना ई-मेलद्वारे पाठविण्यात येणार आहे तसेच अनौपचारिक पुनर्वापर होत असलेल्या तेलाचे नमुनेसुद्धा घेऊन ते तपासणीकरिता पाठविण्यात येणार असल्याची माहिती अन्नपुरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. बुधवारी शहरात हॉटेलची तपासणी करण्याकरिता अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांचे एक पथक तयार करुन त्याद्वारे तपासणी करण्यात आली आहे. मात्र नेमके किती हॉटेलची तपासणी केली व काय कारवाई केली, यासंदर्भाची माहिती जाहीर करण्यात आली नाही. शहरात अनेक किरकोळ व्यावसायिकांनी हातगाड्यांवर खाद्यपदार्थ विक्रीचे व्यवसाय थाटले आहेत. रस्त्यावरच खाद्यपदार्थ तयार केले जातात तसेच याच ठिकाणी खाद्यतेलाचा पुनर्वापर केला जात असल्याची खात्रीलायक माहिती आहे. अनेक व्यावसायिकांनी तर एफडीएकडे अधिकृत नोंदणीसुद्धा केली नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. खाद्यपदार्थ विक्र ीच्या व्यवसायासाठी एफडीएची परवानगी गरजेची आहे.शासनाच्या तेलाच्या पुनर्वापरासंदर्भात ज्या गाईडलाइन्स आहेत, त्या तपासून नोंदणीकृत हॉटेलचालकांना पाठविण्यात येणार आहेत. तेलाची गुणवत्ता तपासणीकरिता शासन अधिकृत एजन्सीची नेमणूक करू शकते. आमच्या स्तरावर हॉटेलचालक दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे.- सुरेश अन्नपुरे, सहआयुक्त अन्न व प्रशासन विभाग अमरावती.