माविमचा हातभार : भरारी लोकसंचालित केंद्राचा पुढाकारमोहन राऊत धामणगाव रेल्वे महिलांमध्ये पुरूषांपेक्षा अधिक काम करण्याची जिद्द, सचोटी व पारदर्शक व्यवहारासोबतच अथक परिश्रम घेण्याची शक्ती असल्यामुळे आता महिलांनी एक पाऊल पुढे टाकत जिल्ह्यात सर्वात प्रथम कृषिसेवा केंद्र व अवजार बँक धामणगावात उभारली आहे़ या क्रांतिकारी पावलासाठी भरारी लोकसंचालित साधन केंद्राने पुढाकार घेतला, तर माविमने हातभार लावला आहे़जिल्ह्यात सर्वाधिक महिला बचत गट धामणगाव तालुक्यात आहेत़ महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत या तालुक्यात भरारी लोकसंचालित साधन केंद्राची स्थापना सन २०१० मध्ये करण्यात आली. या केंद्राअंतर्गत २७५ महिला बचतगटांना प्रशिक्षण देणे आर्थिक व्यवहारात हातभार लावणे़ 'रेकॉर्ड अपडेट' ठेवण्यासाठी संगणकाचे धडे देणे, असा उपक्रम सुरू आहे़जिल्ह्यात पहिले कृषिसेवा केंद्र भरारी लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्षा प्रभा ढाणके, सचिव शालिनी ब्राम्हणकर यांनी व्यवस्थापिका स्वाती चव्हाण यांच्या पुढाकाराने तालुक्यातील महिला बचतगटाकडून सहा लाख रूपयांचा निधी कर्ज स्वरूपात उभारला. माविम अंतर्गत तेजस्विनी प्रकल्पाकडून अडीच लाखाचा निधी घेऊन जिल्ह्यात पहिले कृषिसेवा केंद्र उभारले आहे़या कृषिसेवा केंद्रात सर्वच प्रकारचे बियाणे, खते, गांडूळखत, दशपर्णी, उपलब्ध आहेत.धामणगाव तालुक्यात २७५ महिला बचत गटांतील साडेतीन हजार महिलांपैकी तीन हजार महिलांकडे शेती असून याच कृषिसेवा केंद्रातून खरीप हंगामात लागणारे बियाणे खरेदी करण्याचा मानस या महिलांनी व्यक्त केला आहे़अवजार बँकेत ट्रॅक्टर, डिझेलपंपभरारी लोक संचालित साधन केंद्राच्यावतीने उभारण्यात आलेल्या अवजार बँकेत टॅ्रक्टर, ट्रॉली, रोटावेटर, पंजी, व्ही-पास, पेरणी यंत्र, फवारणी यंत्र, डिझेलपंप, दशमेश, थे्रशर, सेफ्रेटर आदी अवजारे उपलब्ध असून आयडीएचने या अवजार बँकेला मदत केली आहे़एक जुटीचा विजययेथे सुरू झालेल्या कृषिसेवा केंद्र व अवजार बँक उभारण्यासाठी महिला बचतगट व सहयोगिनींचे अथक परिश्रम आहेत़ आज माविमचे जिल्हा समन्वयक खुशाल राठोड, गटविकास अधिकारी कपिलनाथ कलोडे, रविकांत घाटोड, प्रभा ढाणके, शालिनी ब्राम्हणकर, सुरेखा सावळे, मीनाक्षी शेंडे, प्रतिक भेंडे, व्यवस्थापिका स्वाती चव्हाण,सुरेश चवरे, अर्चना गोमासे, रेखा गावंडे, वंदना गोंदाळे, वनमाला मेश्राम यांचे सहकार्य लाभले. बचतगटाच्या एकजुटीचा हा विजय मानला जात आहे़
धामणगावात महिलांनीच उभारले कृषिसेवा केंद्र, अवजार बँक
By admin | Updated: May 25, 2016 00:42 IST