शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

वैतागलेल्या नागरिकांची अभियंत्यावर आगपाखड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 23:30 IST

शिवाजीनगर भागात तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून सुरू असलेल्या सिमेंटरोड बांधकामामुळे वैतागलेल्या नागरिकांचा आणि व्यावसायिकांच्या संयमाचा गुरुवारी बांध फुटला नि शाखा अभियंत्याला सामान्यजनांच्या रौद्ररुपाला सामोरे जावे लागले.

ठळक मुद्देजीवघेणा सिमेंटरोड : कार्यकारी अभियंत्याने केली पाहणी, नियोजनाचा अभाव असल्याचे मान्य

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शिवाजीनगर भागात तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून सुरू असलेल्या सिमेंटरोड बांधकामामुळे वैतागलेल्या नागरिकांचा आणि व्यावसायिकांच्या संयमाचा गुरुवारी बांध फुटला नि शाखा अभियंत्याला सामान्यजनांच्या रौद्ररुपाला सामोरे जावे लागले.त्याचे झाले असे की, दीर्घ कालावधीच्या बांधकामासाठी बारीकसारीक नियोजन आवश्यक ठरते. तथापि, सिमेंटरोडच्या या निर्मितीदरम्यान सामान्यजनांना उद्भवणाºया अडचणींना पर्याय उपलब्ध करून देण्याचे मुळीच नियोजन करण्यात आले नाही. त्यामुळे जिल्हा स्टेडियममध्ये जा-ये करणारे आणि जिल्हा स्टेडियम संकुलातील गाळेधारक यांचा रस्ताच सार्वजनिक बांधकाम विभागाने बंद करून टाकला. उड्डाणपुलापासून संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनापर्यंतचा परिसर रस्तानिर्मितीसाठी ताब्यात घेण्यात आला. हा ताबा घेऊन तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला. मात्र, काम कासवगीतने सुरू आहे. यादरम्यान जिल्हा स्टेडियममध्ये खेळादी कार्यासाठी येणाºया लोकांनी मिळेल ते मार्ग काढले. कुणी अर्धवट फुटपाथहून, तर कुणी बांधकामस्थळाहून ये-जा करू लागले. या प्रकारात रोज किरकोळ अपघातांची मालिका सुरू झाली. न थांबणारी ही मालिका अध्येमध्ये घडणाऱ्या गंभीर अपघातांमुळे चिंताजनक आणि चीड आणणारी ठरली. गुरुवारी एका इसमाचा गंभीर अपघात झाला. मृत्यूच्या दाढेत विसावताना तो बचावला. दुसऱ्या एका तरुणाची नवी कोरी दुचाकी आडवीतिडवी पडली. दोघांच्या संतापाला यापूर्वी असाच अनुभव आलेल्यांची जोड मिळाली. जत्था एकत्र झाला. बांधकामस्थळी कार्यरत असलेल्या शाखा अभियंता श्रीकृष्ण गोमकाळे यांच्या दिशेने झेपावला.आमचा रस्ता बंद करणारे तुम्ही कोण? आमचे जीव घेणार काय तुम्ही? आमचे नुकसान तुम्ही भरून देणार काय? नको आम्हाला तो रस्ता! अशा प्रश्नांची सरबत्ती होऊ लागली. संताप चढत गेला. नको त्या शब्दांमध्ये तो रुपांतरित झाला नि सारी आगपाखड त्या शाखा अभियंत्यांवर निघाली. वेळीच स्थिती सावरल्याने अनर्थ टळला.त्रुटी सुधारा, शेंडगे यांचे आदेशया घटनेनंतर सायंकाळी कार्यकारी अभियंता सदानंद शेंडगे यांनी बांधकामस्थळाची पाहणी केली. 'लोकमत'ने हा मुद्दा सुरुवातीपासून तंत्रशुद्धरीत्या उचलून धरल्याने 'लोकमत'कडून बांधकाम आणि नियोजनातील उणिवा समजून घेतल्या. तासभराच्या सर्व्हेक्षणानंतर नियोजनात गंभीर उणिवा आणि त्रुटी असल्याचे शेंडगे यांनी मान्य केले. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी दिलेत. यावेळी मिलिंद पाटणकर उपस्थित होते.