शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी गोवारींच्या सवलतीसाठी पुन्हा राज्यभर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 16:32 IST

गोवारी ही आदिवासी जमात असल्याचा निर्वाळा साडेतीन महिन्यांपूर्वी उच्च न्यायालयाने दिला. विधानसभा व विधानपरिषदेत गोवारीचा प्रश्न मांडला गेला.

- मोहन राऊत 

धामणगाव रेल्वे (अमरावती) : गोवारी ही आदिवासी जमात असल्याचा निर्वाळा साडेतीन महिन्यांपूर्वी उच्च न्यायालयाने दिला. विधानसभा व विधानपरिषदेत गोवारीचा प्रश्न मांडला गेला. मात्र, अद्यापही न्यायालयाच्या निर्णयाचा शासकीय अध्यादेश काढला नसल्याने आदिवासी गोवारी समन्वय समितीच्यावतीने राज्यात १५ डिसेंबरपासून राज्यभरात अन्न व देहत्याग आंदोलन करण्याचा निर्णय राज्य समितीच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला.

आदिवासी गोवारी समाज हा आपला न्याय हक्काचा लढा चार दशकांपासून लढत आहे. ११४ गोवारी बांधव या लढ्यासाठी शहीद झाले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १४ आॅगस्ट रोजी ऐतिहासिक निर्णय देऊन गोवारी जमात ही आदिवासी असल्याचा स्पष्ट निर्णय दिला राज्य सरकारने याची त्वरित अंमलबजावणी करावी, असे निर्णयात म्हटले होते. या निर्णयाला चार महिने पूर्ण होत असताना शासनाने न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली नाही. 

आंदोलनाचा तिसरा टप्पाआदिवासी गोवारी समन्वय समितीचे राज्य समन्वयक शालिक नेवारे यांच्या नेतृत्वात राज्यात प्रथम सर्व तालुका प्रशासनाला निवेदन दिले. तदनंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर शांततेच्या मार्गाने मोर्चा काढला होता. आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसून अन्न व देहत्याग असे आंदोलन करण्याचा निर्णय राज्यातील सर्व जिल्हा समन्वयकच्या संमतीने घेण्यात आला.

शासन कधी घेणार निर्णय?विधानसभा व विधानपरिषदेत गोवारी जमातीचा प्रश्न काही लोकप्रतिनिधींनी  विचारला. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटिल यांनी गोवारी समाजाच्या आरक्षणाविषयी त्वरित निर्णय घेण्यात येईल. असेच विधान परिषदेत प्रश्नाला उत्तर देतांना म्हटले होते. मात्र, अद्यापही राज्य शासनाने आपले सकारात्मक पाऊल उचलले नसल्याने राज्यातील या आदिवासी गोवारी समाजाला सरकारच्या भूमिकेविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.

विदर्भात आंदोलनाची तयारीआदिवासी गोवारी समन्वय समितीच्यावतीने १५ डिसेंबर रोजी सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ११४ गोवारी बांधवाच्या अधिक संख्येने आंदोलनाला सुरूवात होईल. सरकार आपली भूमिका स्पष्ट करणार नाही. तिथपर्यंत अन्नाचा एक घास व पाण्याचा एक थेंबही घेतला जाणार नाही, असा निर्णय तिवसा तालुक्यातील मिरचापूर येथील राज्य सह समन्वयक मारोतराव वाघाडे यांच्या फार्म हाऊस येथे घेतलेल्या महत्त्वाच्या बैठकीत घेण्यात आला.

 राज्य सरकारने आम्हा गरीब  आदिवासी गोवारीचा अंत पाहू नये न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी  हीच आमची मूड मागणी आहे - शालिक नेवारे, राज्य समन्वयक आदिवासी गोवारी समन्वय समिती नागपूर

टॅग्स :Amravatiअमरावती