शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
2
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
3
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
4
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?
5
"आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती
6
"...असे जीवन जगत राहा"; 'मिसेस मुख्यमंत्र्यां'ची देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी खास पोस्ट
7
१२ कोटी रुपये, BMW आणि मुंबईत घर... पोटगीची मागणी ऐकून सुप्रीम कोर्ट म्हणालं,'तू कमवत का नाही?'
8
शेअर असावा तर असा...! ₹15 वरून ₹455 वर पोहोचला शेअर, आता मोठा व्हिस्की ब्रँड खरेदी करणार कंपनी!
9
Ajit Pawar Birthday: अजित पवारांचा असाही एक कार्यकर्ता, ११ एकर शेतजमिनीवर दादांचे चित्र रेखाटून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
10
२ मिनिटांत ₹१००० कोटींचा नफा; 'या' कंपनीच्या शेअरनं केली कमाल, मालकासह गुंतवणूकदारही मालमाल
11
सावधान...! १७ रुपयांपर्यंत घसरू शकतो या बँकेचा शेअर, २-२ तज्ज्ञांनी दिलाय विक्रीचा सल्ला; जाणून घ्या
12
मस्करीची कुस्करी! मी पडले तर तू मला वाचवशील? नवऱ्याला प्रश्न विचारला, कठड्यावरुन पाय घसरला
13
“माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिंमत CM फडणवीस यांच्यात नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
राजीनामा-शासन भिकारी, माणिकराव कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...
15
वालाचं बिरडं आणि डाळिंब्यांची उसळ यात आहे छोटासा फरक; श्रावण विशेष पारंपरिक रेसेपी 
16
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
17
Post Office मध्ये जमा करा १ लाख, मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स व्याज; चेक करा डिटेल्स
18
प्राजक्ता माळीसोबत फोटो हवा म्हणून त्याने लिफ्टच थांबवली, पुढे काय घडलं? Video व्हायरल
19
कसोटीत सर्वाधिक मेडन ओव्हर्स टाकणारे टॉप ५ भारतीय गोलंदाज!
20
अदानी-महिंद्रासह दिग्गज स्टॉक्स गडगडले! सेन्सेक्स-निफ्टी सपाट; मात्र 'या' शेअरने केली कमाल!

पुन्हा जिल्हा परिषदेत एनओसीचा मुद्दा तापणार

By admin | Updated: July 10, 2014 23:20 IST

जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणारे रस्ते कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला वळते करावे व यासाठी लागणारी जिल्हा परिषदेची एनओसी नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी

अमरावती : जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणारे रस्ते कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला वळते करावे व यासाठी लागणारी जिल्हा परिषदेची एनओसी नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा बोलविण्याची मागणी काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात सुमारे २७ सदस्यांच्या स्वाक्षरीने अध्यक्ष यांना पत्राद्वारे केली आहे. रस्त्याच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. मात्र हा निधी खर्च करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे स्वत:च्या मालकीचे रस्ते कमी असल्यामुळे निधी खर्च करताना अडचणी निर्माण होत आहे. शासकीय निधी रस्त्याच्या विकासकामांवर खर्ची घालता यावा, यासाठी जि.प.च्या अखत्यारित असलेले रस्ते विकासकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला वळते करावी व यासाठी लागणारे जिल्हा परिषदेचे नाहरकत प्रमाणपत्र देण्याबाबत नियमानुसार विशेष सभा बोलविण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख, महेंद्रसिंग गैलवार, गिरीश कराळे आदी सदस्यांसह काँग्रेस, प्रहार व जनसंग्रामच्या काही सदस्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांना दिले आहेत. यापूर्वीही जि. प. च्या मालकीचे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाला कामांसाठी देण्याबाबतचा विषय चांगलाच तापला होता. विशेष सभेसह अनेक राजकीय उलथापालथी झाल्यानंतर हा मुद्दा पालकमंत्री, ग्रामविकास मंत्री यांच्यापर्यंत पोहचला होता. अखेर जिल्हा परिषदेतील सत्ताधारी व विरोधकांमध्ये प्रदीर्घ चर्चेनंतर तोडगा काढून ६ कोटींच्या वाटाघाटीनंतर जिल्हा परिषदेने सार्वजनिक बांधकाम विभागाला नाहरकत प्रमाणपत्र दिले होते. परंतु आता पुन्हा नव्याने नाहरकत प्रमाणपत्रासाठी विशेष सभा लावण्याची मागणी केली जात आहे. (प्रतिनिधी)