शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा गुटख्याचा बाजार सुरू

By admin | Updated: July 27, 2016 23:55 IST

शहरात पुन्हा गुटख्याची विक्री राजरोसपणे सुरू झाली आहे. दोन आठवडयांपूर्वी महसूल विभागाने धाडसत्र राबवून कोेट्यवधी रूपयांचा गुटखा जप्त केला होेता.

सहज होतोय उपलब्ध : नियमांचे उल्लंघन, एफडीएचे अधिकारी करतात तरी काय?अमरावती : शहरात पुन्हा गुटख्याची विक्री राजरोसपणे सुरू झाली आहे. दोन आठवडयांपूर्वी महसूल विभागाने धाडसत्र राबवून कोेट्यवधी रूपयांचा गुटखा जप्त केला होेता. त्यामुळे अवैध गुटखाविक्रेत्यांचे धाबे दणाणले होते. यानंतर जिल्ह्यात काही दिवस गुटखाबंदी होती. परंतु आता शहरात पुन्हा मोठया प्रमणात गुटखाविक्री सुरू झाली आहे. याकडे एफडीएच्या अधिकाऱ्यांचे मात्र दुर्लक्ष आहे. एफडीएचे सहआयुक्त चंद्रशेखर साळुंके यांची याप्रकरणी आयुक्त हर्षदीप कांबळे यांनी उचलबांगडी केली होती. त्यांची मुंबई येथे बदली केल्याने सहआयुक्तांना प्रभारी कारभार देण्यात आला आहे. वास्तविक त्यांच्याकडून गुटखाविक्रेत्यांवर धाडी टाकणे अपेक्षित होते. पण, तसे होताना दिसून येत नाही. पण, अंबानगरीतील गुटखाविक्रेत्यांना रोखण्यात एफडीएच्या अधिकाऱ्यांना अपयश येत आहे. येथील राजकमल चौक, जयस्तंभ चौक, नगर वाचनालय, जिल्हा परिषद जवळ अशा अनेक ठिकाणी अवैध गुटखा विकला जात आहे. त्यामुळे पुन्हा एफडीए अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन करून सर्वप्रथम एफडीएची पोलखोल केली होती. महसूल विभागाने व पोलिसांनी अनेक कारवाया केल्या. यानंतर अन्न व सुरक्षा मानके कायद्याची अंमलबजाणी होईल असे वाटत होते, मात्र व्यर्थ!अंबानगरीतील अवैध गुटखा विकणे केव्हा बंद होणार, असा सवाल विचारला जात आहे. काही दिवसांपूर्वी महसूल विभागाने टाकलेल्या धाडीनंतर मोठा गुटखासाठा जप्त करुन तो नष्ट केल्याने अनेक गुटखाविक्रेत्यांनी या कारवाईची धास्ती घेतली होती. स्वत: जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनीच ही कारवाई केल्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले. परंतु पंधरा दिवसांतच जैसे- थे परिस्थिती निर्माण झाली आहे. गुटखाविक्रीची पाळेमुळे किती खोलवर गेली आहेत, हेच यावरून स्पष्ट होत आहे. (प्रतिनिधी) एफडीएद्वारे सहा ठिकाणी कारवाईमागील आठवड्यात ६ ठिकाणी कारवाई करुन गुटखा पकडल्याचे एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यापैकी चार कारवाई अमरावतीत करण्यात आल्या तर दोन अचलपुरात करण्यात आल्या आहेत. यामध्ये २ लक्ष रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. एफडीएचे प्रभारी सहआयुक्त शशीकांत केकरे आल्यानंतर त्यांच्या आदेशान ही कारवाई करण्यात आली. प्रत्येक पानटपरीवर गुटखा सद्यस्थितीत आहे तरी कुठे गुटखाबंदी? असा प्रश्न विचारला जात असून अन्न व सुरक्षा मानके कायद्याची पायमल्ली केली जात आहे. जिल्हयात प्रत्येक पानटपरीवर गुटख्यांच्या पुड्या व सुगंधी तंबाखू सहज उपल्ब्ध होत असल्याने सर्व नियम धाब्यावर बसविले जात आहेत. एफडीएच्या प्रभारी सहआयुक्तंकडून कारवाईची अपेक्षा आहे. पण, त्यांनीही या विषयावर मौन ठेवले आहे.