शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 23:12 IST

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अभिनव योजना ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’चे लोण पुन्हा पसरू लागले आहे.

ठळक मुद्दे‘बोगस फॉर्म’ची विक्री जोरात : जिल्हाभरात नागरिकांची धावाधाव

आॅनलाईन लोकमततिवसा : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अभिनव योजना ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’चे लोण पुन्हा पसरू लागले आहे. काही दिवसांपूर्वी अशी कोणतीही योजना अस्तित्वात नसल्याचा खुलासा प्रशासनाकडून करण्यात आला होता. तरीही आता पुन्हा ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ या बनावट योजनेच्या माध्यमातून नागरिक ांकडून पैसे जमा करणे सुरू झाले असल्याचे चित्र आहे.नोंदणी फॉर्म भरण्यासाठी तिवसा तालुक्यासह जिल्हाभरातील टपाल कार्यालयात नागरिकांची झुंबड उडाली आहे. या योजनेतून दोन लाख रुपये अनुदान दिले जाणार असल्याचे सांगून सर्वसामान्य नागरिकांची लूट करण्यात येत आहे. मात्र, अशी कोणतीही योजना अस्तित्वात नसल्याचा खुलासा प्रशासनाच्यावतीने करण्यात आला. तरीही बºयाच झेरॉक्स सेंटरवर फॉर्म विक्री होत असून, त्यासाठी लागणारी इतर कागदपत्रेही झेरॉक्स करून देण्यात येत आहेत. हा फॉर्म टपाल करण्यापर्यंत एका व्यक्तीला जवळपास शंभर रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत आहे.अशी कोणतीही योजना नाही‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ या योजनेच्या नावावर शेकडो ‘बोगस फॉर्म’ची विक्री होत आहे. या योजनेतून दोन लाख रुपये थेट अनुदान मिळणार असल्याचे बोलले जात आहे. परंतु, केंद्र सरकारची अशी योजना नसल्याचे प्रशासनाने जाहीर केले. तरीही ग्रामीण भागात या योजनेंतर्गत विद्यार्थींसाठी दोन लाख रुपयांचा थेट लाभ मिळणार असल्याची बातमी जोरात परसत चालली आहे.माहितीचा होईल दुरुपयोगअर्जामध्ये विविध माहिती मागण्यात आलेली असून, त्यामध्ये अर्जदाराची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती तसेच बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक आदी माहिती मागविण्यात आली आहे. ही माहिती भरून दिल्यास त्याचा दुरुपयोग होण्याची मोठी शक्यता असल्याचे प्रशासनाने सांगितले. यामुळे कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.‘प्रधानमंत्री बेटी बचाओ-बेटी पढाओ’ योजनेच्या नावावर सर्वसामान्य जनतेची होणारी लूट प्रशासनाने योग्य चौकशी करून तत्काळ थांबवावी. योजनेची योग्य माहिती जनतेपर्यंत पोहचवावी.- अभिजित बोके, जिल्हा परिषद सदस्यजानेवारी २०१५ मध्ये ’प्रधानमंत्री बेटी बचाओ-बेटी पढाओ’ ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेमध्ये वस्तुरुपात किंवा आर्थिक स्वरूपात मदत केली जात नाही. महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे फसवणुकीची तक्रार केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करू. - राम लंके, तहसीलदार, तिवसा