शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा 376 पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 05:00 IST

कोरोना आता संपणार, असे दिलासादायक चित्र असताना फेब्रुवारीत अचानक कोरोनाग्रस्तांच्या संख्येने उचल खाल्ली. प्रथम शंभरावर, त्यानंतर दीडशतकी, दोन शतकी व आता चार दिवसांपासून तीन शतकी मजल कोरोना गाठत आहे. १० फेब्रुवारीला ३५९, ११ फेब्रुवारीला ३१५, १२ फेब्रुवारीला ३६९ आणि शनिवारी ३७६ चा आकडा कोरोनाने गाठला. कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा ही चिंतेची बाब ठरली आहे. त्यामुळे आतापर्यंत २४,८९५ अशी कोरोनाग्रस्तांची नोेंद झाली आहे. 

ठळक मुद्देएकाचा मृत्यू, २८६ जणांना डिस्चार्ज, एकूण रुग्ण २४,८९५

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाच्या नव्या आक्रमणाने अमरावती हैराण झाले आहे. शनिवारी ३७६ कोरोनारुग्ण आढळून आले. १० फेब्रुवारीपासून सातत्याने ३०० हून अधिक रुग्ण चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. जिल्हा २५ हजार रुग्णसंख्येच्या निकट पोहोचला आहे. अमरावती जिल्ह्यात जानेवारीच्या अखेरपर्यंत कोरोनाग्रस्तांचा पॉझिटिव्ह अहवाल शंभराच्या आत होता. कोरोना आता संपणार, असे दिलासादायक चित्र असताना फेब्रुवारीत अचानक कोरोनाग्रस्तांच्या संख्येने उचल खाल्ली. प्रथम शंभरावर, त्यानंतर दीडशतकी, दोन शतकी व आता चार दिवसांपासून तीन शतकी मजल कोरोना गाठत आहे. १० फेब्रुवारीला ३५९, ११ फेब्रुवारीला ३१५, १२ फेब्रुवारीला ३६९ आणि शनिवारी ३७६ चा आकडा कोरोनाने गाठला. कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा ही चिंतेची बाब ठरली आहे. त्यामुळे आतापर्यंत २४,८९५ अशी कोरोनाग्रस्तांची नोेंद झाली आहे. दरम्यान, कोरोनामुक्त झालेल्या २८६ जणांना शनिवारी कोविड रुग्णालयातून सुटी देण्यात आली. अशाप्रकारे कोरोनामुक्तांची संख्या आता २३,३८० झाली आहे. दिवसभरात एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाने घेतलेल्या बळींची संख्या ४३२ झाली आहे. .  दरम्यान, नागरिकांच्या सुविधेसाठी सर्व आस्थापना, सुविधा सुरळीत सुरू राहतील. तथापि, कोविड प्रतिबंधासाठी बाजारपेठा, प्रार्थनास्थळे आदी सार्वजनिक ठिकाणी गर्दीला प्रतिबंध करणारा आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष शैलेश नवाल यांनी जारी केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी शनिवारी दिली.

पाचहून अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई संचारबंदीच्या तत्त्वानुसार पाचहून अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. यात्रा, उत्सव, सभा, संमेलने बंद राहतील. लग्नसमारंभासाठी ५० हून अधिक व्यक्ती उपस्थित राहू शकत नाहीत.  प्रार्थनास्थळी गर्दी होऊ नये व सोशल डिटन्स पाळणे जाईल याची दक्षता घेण्याची सूचना  देण्यात आली आहे. 

दहावी-बारावीच्या शाळा वगळल्याइयत्ता दहावी - बारावीचे वर्ग वगळून शाळा, महाविद्यालये यांसह सर्व कोचिंग क्लासेस व शिकवण्याही २८ फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील. बाजारपेठ व सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी कारवाईचे निर्देश पोलीस व स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईचे निर्देश देण्यात आले आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या