शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

जबरीच्या गर्भपातानंतरही दुसऱ्यांदा लादले गर्भारपण!, वारंवार बलात्कार, फेसबुक फ्रेंडचा कारनामा

By प्रदीप भाकरे | Updated: April 23, 2023 19:01 IST

याप्रकरणी पिडिताच्या तक्रारीवरून नांदगाव पेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

अमरावती: जबरदस्तीने केलेल्या गर्भपातानंतरही फेसबुक फ्रेंडने एका तरूणीवर दुसऱ्यांदा गर्भारपण लादले. १ जानेवारी २०२१ ते २१ एप्रिल २०२३ दरम्यान ती अत्याचाराची मालिका चालली. याप्रकरणी पिडिताच्या तक्रारीवरून नांदगाव पेठ पोलिसांनी २२ एप्रिल रोजी आरोपी आकाश भाऊराव आमदरे (२७, रा. घोडदेव, ता. मोर्शी, जि. अमरावती) याच्याविरूध्द बलात्कार, जबरीने गर्भपात व ॲट्रासिटी अन्वये गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, जिल्हयातील एका तरूणीची आरोपी आकाशसोबत फेसबुकवर ओळख झाली. सन २०२१ च्या पुर्वार्धात त्यांच्यात प्रेमबंध निर्माण झाले. दोघांमध्ये सोशल मिडियावर संवाद सुरू झाला. प्रेमाच्या आणाभाका झाल्या. ही पुर्णपणे आपल्या प्रेमाची ॲडिक्ट झाल्याचे लक्षात येताच त्याने तिला लग्नाचे आमिष दिले. मी तुझ्याशी लग्न करणार आहे, अशी बतावणी करून त्याने त्याच्या चारचाकी वाहनातच तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. पुन्हा लग्नाचे आमिष दाखवून नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये देखील तिच्यासोबत शरीर संबंध प्रस्थापितक केले. त्यानंतर वारंवार त्याने तिचे सर्वस्व लुटले. त्यातून सन २०२२ मध्ये पिडिताला गर्भधारणा झाली. त्यावेळी आरोपीने कुठलेसे औषध देवून तिचा घरीच गर्भपात घडवून आणला. त्यानंतरही तो पिडिताला भेटत राहिला. तथा त्याने जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यातून पिडितेला सध्या दोन महिन्यांची गर्भधारणा झाली.

तो मी नव्हेच!

पुन्हा गर्भधारणा झाल्याने पिडिताने आकाशकडे लग्नाबाबत हेका धरला. त्याला वारंवार विचारणा केली. मात्र त्याने तो मी नव्हेचचा पवित्रा घेत नकारघंटा चालविली आहे. त्याने भेटायला येणे देखील टाळले आहे. आरोपी आकाश हा आपल्याला गर्भपातासाठी धमकावत असून ते न केल्यास मारण्याची धमकी देत असल्याची फिर्याद पिडिताने नांदगाव पेठ पोलिसांत नोंदविली आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने २१ रोजी रात्री पोलीस ठाणे गाठले. तथा उशिरा रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. तेथे महिला पोलीस अधिकाऱ्यांनी तिचे बयाण नोंदवून घेतले. पुढील तपास ठाणेदार प्रवीण काळे करीत आहेत.