शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

-तर आमदारकीचा राजीनामा देईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 23:16 IST

स्थानिक संजय गांधीनगर हे वनजमिनीवर वसले असले तरी त्या मोबदल्यात वनविभागाला दुसरी जमीन दिली जाईल.

ठळक मुद्देरवि राणा : संजय गांधीनगरातील एकही घर हटवू देणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्थानिक संजय गांधीनगर हे वनजमिनीवर वसले असले तरी त्या मोबदल्यात वनविभागाला दुसरी जमीन दिली जाईल. किंबहुना एकाही घराला धक्का लागल्यास मी आमदारकीचा राजीनामा देईन, अशी ग्वाही आमदार रवि राणा यांनी दिली.संजय गांधीनगरवासीयांना वनविभागाने घरे हटविण्यासाठी नोटिसा बजावल्याच्या पार्श्वभूमीवर आ. रवि राणा यांनी रविवारी बैठक घेतली. यावेळी आ. राणा यांनी संजय गांधीनगर परिसरात हजारो नागरिकांसमक्ष शपथ घेताना संजय गांधीनगरातील एकाही घराला धक्का लागला तर आमदारपदाचा राजीनामा देईन, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनुसार वनविभागाच्या जमिनीवरील एकही घरे हटणार नाही, असा शब्द त्यांनी दिल्याचे आमदार रवि राणा यांनी यावेळी नागरिकांना सांगितले. नोटीस बजावणे हे प्रशासनाचे कर्तव्यच आहे. मात्र, यात काहीही तथ्य नाही.कायमस्वरुपी घरे मिळवून देऊसंजय गांधीनगराबाबत मी स्वत: दक्ष असून एकाही घराला धक्का लागू देणार नाही. एवढेच नव्हे, तर संजय गांधीनगरवासीयांना कायमस्वरूपी मालकी हक्क मिळवून देणार, अशी हमी आ. रवि राणांनी दिली. संजय गांधीनगरवासीयांचा अतिक्रमणाचा प्रश्न यापूर्वीच शासनस्तरावर मांडण्यात आला आहे. वनविभागाच्या जागेत हे नगर वसले असून त्यांना हटविणे शक्य नसल्याने वनविभागाला पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात शासनाने होकारही दर्शविला आहे. याबाबत लवकरच शिक्कामोर्तब केले जाईल, असा विश्वास आमदार राणा यांनी व्यक्त केला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील याबाबत सकारात्मक असून लवकरच या प्रश्नावर तोडगा निघेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. याप्रसंगी नगरसेवक ऋषि खत्री, माला देवकर, विधी सभापती सुमती ढोके, आशिष गावंडे, सपना ठाकूर, माजी नगरसेवक मंगेश मनोहरे आदी उपस्थित होते.