शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दीपाली चव्हाण यांची डायरी वाचून समिती झाली सुन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:13 IST

विनाेद शिवकुमारच्या अन्यायाची डायरीत नोंद, मेळघाटात महिला वनकर्मचाऱ्यांना त्रास देण्याची परिसीमा ओलांडली अमरावती : हरिसाल येथील वनक्षेत्र अधिकारी दीपाली ...

विनाेद शिवकुमारच्या अन्यायाची डायरीत नोंद, मेळघाटात महिला वनकर्मचाऱ्यांना त्रास देण्याची परिसीमा ओलांडली

अमरावती : हरिसाल येथील वनक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांची वैयक्तिक डायरी वाचून वनविभागाची तपासणी समितीदेखील सुन्न झाली. दीपाली यांच्या आत्महत्याप्रकरणी मुख्य आरोपी विनोद शिवकुमार याच्या अन्यायाबाबतची यात नोंद असून, मेळघाटात महिला वनकर्मचाऱ्यांना कसा त्रास दिला जातो, याविषयी वास्तव लिहिले आहे.

दीपाली यांनी २५ मार्च रोजी गोळी झाडून आत्महत्या केली. याप्रकरणाने संपूर्ण वनविभाग हादरून गेला आहे. परिणामी राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक पी. साईप्रसाद यांनी ३१ मार्च रोजी दीपाली यांच्या मृत्युप्रकरणी तपासणी करण्यासाठी वनविभागाची नऊ सदस्यीय समिती गठित केली. या समितीने ११ व १२ एप्रिल रोजी मेळघाटसह अमरावतीत दौरा केला. या मुख्य समितीने तपासणीच्या अनुषंगाने तीन उपसमिती तयार केल्या आहेत. त्यापैकी एका उपसमितीत वनविकास महामंडळाच्या मुख्य महाव्यवस्थापक मीरा (अय्यर) त्रिवेदी, सेवानिवृत्त विभागीय वन अधिकारी किशोर मिस्त्रीकोटकर तर, अमरावतीच्या सहायक वनसंरक्षक ज्योती पवार यांचा समावेश आहे. या समितीने १२ एप्रिल रोजी हरिसाल येथील दीपाली यांचे कार्यालय, निवासस्थानी भेट दिली. काही वन कर्मचाऱ्यांशी संवाद, चर्चा केली. दरम्यान तपासणी समितीला दीपाली यांची वैयक्तिक दैंनदिनी डायरी आढळून आली. या डायरीत दीपाली यांनी विनोद शिवकुमार याच्या मानसिक, शारीरिक त्रासाची नोंद केली आहे. ही डायरी वाचून समितीमधील महिला सदस्यदेखील सुन्न झाल्यात. मेळघाटात महिला वन कर्मचाऱ्यांना त्रास देण्याची परिसीमा विनोद शिवकुमार याने ओलांडल्याचे मत या समितीचे आहे. विनोद शिवकुमार हा ‘रूद्र’ वायरलेसवरून दीपाली यांना लगेच येण्याचे मॅसेज द्यायचा. दीपाली या वाहनांनी हरिसाल येथून चिखलदरा येथे मुख्यालयी जाण्यासाठी निघाल्या की, शिवकुमार हा पुन्हा १५ ते २० मिनिटांनी आता येऊ नका, काम झाले असे म्हणत त्यांना परत पाठवित हाेता. असा प्रकार एकदा नव्हे तर महिन्यातून दोन ते तीन वेळा शिवकुमार करीत होता. गर्भधारणा झाल्यानंतर हा प्रकार वाढतच गेला अशी दीपाली यांनी नोंद करून ठेवली आहे. दीपाली यांनी वैयक्तिक डायरीत मांडलेली व्यथा वाचून समितीने खरेचं मेळघाटात महिला वनकर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावणे ‘चॅलेंजिंग’ असल्याचा अभिप्राय नोंदविला आहे.

--------------------

तपासणीदरम्यान समिती सदस्यांचा मोबाइल ‘स्वीच ऑफ’

दीपाली यांच्या मृत्युप्रकरणी वनविभागाने स्वतंत्रपणे तपासणी करण्यासाठी गठित केलेल्या नऊ सदस्यीय समितीचे अध्यक्ष अथवा सदस्यांचे मोबाइल तपासणीदरम्यान ‘स्वीच ऑफ’ राहतात. तशी स्वत:हून समितीने गाईडलाईन नेमून ठेवली आहे. तपासणीकामी असताना काेणाचेही मोबाइल सुरू राहणार नाही, असे निश्चित केले आहे. याची प्रचिती १२ एप्रिल राेजी मेळघाट दौऱ्यात दिसून आली.

------------------

नागपूर येथे समितीची आढावा बैठक

दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी नऊ सदस्यीय समितीचे गठन झाले. या समितीचा पहिला दौरा आटोपला आहे. पहिल्या दौऱ्यात समितीला नेमके काय आढळून आले, याबाबत आढावा घेण्यासाठी सोमवार, १९ एप्रिल रोजी नागपूर येथे प्रधान मुख्य वनसंरक्षक पी. साईप्रसाद यांनी बैठक बोलावली आहे. समितीचे अध्यक्ष, सदस्य नागपूर येथे उपस्थित होण्यासाठी पोहोचले आहेत. मात्र, या आढावा बैठकीत वनविभागाची काय भूमिका ठरली, हे मात्र कळू शकले नाही.