शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद नोकर भरतीत तोंडी परीक्षा बाद

By admin | Updated: September 4, 2014 23:28 IST

जिल्हा परिषदेतील गट ‘ब’ आणि गट ‘क’ मधील अराजपत्रीत पद भरती करताना उमेदवारांची मौखीक परीक्षा न घेता लेखी परीक्षेतील त्यांच्या गुणवत्तेनुसार निवड सुची तयार करून पद भरतीची प्रक्रिया

शासन निर्णय : गैरप्रकाराला आळा बसणारअमरावती : जिल्हा परिषदेतील गट ‘ब’ आणि गट ‘क’ मधील अराजपत्रीत पद भरती करताना उमेदवारांची मौखीक परीक्षा न घेता लेखी परीक्षेतील त्यांच्या गुणवत्तेनुसार निवड सुची तयार करून पद भरतीची प्रक्रिया करण्याबाबतचा निर्णय राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे खऱ्या अर्थाने तयारी करून वरील पदाकरिता परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना याचा फायदा होणार आहे. याशिवाय नोकर भरतीत होणाऱ्या गैरप्रकारांनाही आळा बसणार आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने १९ आॅक्टोबर २००७ रोजी भुतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट ‘क’ मधील लिपीकवर्गीय पदांकरीता मौखीक परीक्षा न घेता लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार निवड सुची तयार करून पदभरती करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. याशिवाय २६ डिसेंबर २०११ ला सुद्धा शासनाने गट ‘क’ वर्गातील पदभरतीसाठी वरीलप्रमाणे निकष वापरण्याच्या सूचना पुन्हा देण्यात आल्या होत्या. याच शासन निर्णयात शासनाने दुरूस्ती करीत ५ जून २०१४ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयात गट ‘क’ आणि गट ‘ब’ अराजपत्रीत मधील कुठल्याही पदाकरिता उमेदवारांची निवड करताना मौखीक परीक्षा मुलाखती घेऊ नये असे स्पष्टेपणे नमूद केले आहे. त्याऐवजी या पदांकरिता उमेदवार निवडताना त्यांची २०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात यावी त्या परीक्षेत प्राप्त गुणाच्या आधारे निवड सुची तयार करून त्यांची गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात यावी. ज्या पदांसाठी लेखी परीक्षा व व्यावसायिक चाचणी घेणे आवश्यक असेल अशा पदांसाठी १२० गुणांची लेखी परीक्षा आणि ८० गुणांची व्यावसायिक चाचणी अशी गुण विभागणी करावी. सुतार, गवंडी, वाहन चालक अशा शालांत परीक्षा उत्तीर्ण पेक्षा कमी अर्हता आवश्यक असणाऱ्या पदांसाठी ६० गुणांची व्यावसायिक, चाचणी आणि ४० गुणाची शारीरिक चाचणी घेऊन त्यांची निवड करावी. ज्या पदासाठी शारीरिक क्षमता चाचणीची गरज नाही अशा पदांसाठी शंभर गुणाची व्यावसायिक चाचणी घेऊन उमेदवारांची निवड करावी असे शासनाने जारी केलेल्या निर्णयात म्हटले आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद नोकरभरतीत मौखीक परीक्षा घेतली जाणार नाही. (प्रतिनिधी)