शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

बहुमत असताना उपसरपंचाची निवड ठरविली बाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 23:29 IST

ऑनलाईन लोकमत अमरावती : भातकुली तालुक्यातील वलगाव येथे उपसरपंच निवडणुकीदरम्यान बहुमतात असलेल्या उमेदवाराला अपात्र ठरविण्यात आल्याची तक्रार जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे बुधवारी करण्यात आली. गुप्त मतदानानंतर बहुमत मिळालेल्या सदस्याला अपात्र ठरविण्यात आले, तर कमी मते असतानाच तेच उपसरपंच असतील असा फतवा सरपंचाने काढला.गत महिन्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत वलगाव येथील सरपंचपदी मोहिनी ...

ठळक मुद्देगुप्त मतदान : वलगाव येथील पहिल्या मासिक सभेतील प्रकार

ऑनलाईन लोकमत अमरावती : भातकुली तालुक्यातील वलगाव येथे उपसरपंच निवडणुकीदरम्यान बहुमतात असलेल्या उमेदवाराला अपात्र ठरविण्यात आल्याची तक्रार जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे बुधवारी करण्यात आली. गुप्त मतदानानंतर बहुमत मिळालेल्या सदस्याला अपात्र ठरविण्यात आले, तर कमी मते असतानाच तेच उपसरपंच असतील असा फतवा सरपंचाने काढला.गत महिन्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत वलगाव येथील सरपंचपदी मोहिनी मोहोड या थेट जनतेतून निवडून आल्या. त्यानंतर मंगळवारी (दि.२८) पहिल्या मासिक सभेत उपसरपंचाची निवड करायची होती. सरपंच मोहिनी मोहोड यांच्या अध्यक्षतेत झालेल्या निवडप्रक्रियेत उपसरपंचपदासाठी महेश उकटे व विजय जोशी यांनी उमेदवारी दाखल केली. एकूण १७ सदस्यांनी निवडणुकीत सहभाग नोंदविला. मार्कर पेनचा वापर करीत गुप्त पद्धतीने मतदान झाले. निकालाअंती १७ पैकी १६ सदस्यांनी मार्कर पेन वापरला, तर एका सदस्याने बॉल पेन वापरला. त्यामुळे ही निवड प्रक्रिया रद्द ठरविण्यात आली. काही वेळात पुन्हा निवडणूक प्रक्रिया राबविली गेली. त्यामध्ये महेश उकटे यांना नऊ व विजय जोशी यांना आठ मते मिळाली. तरीही जोशी हेच उपसरपंच असतील, असे सरपंचांनी सांगितले.जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारसंवैधानिक पद्धती नाकारून महिला सरपंचाने केलेला हा प्रकार अन्यायकारक असून, याबाबत बुधवारी सकाळी वलगाव येथील ग्रामपंचायत सदस्य महेश उकटे, प्रफुल खोडस्कर, जगदीश भटकर, गजानन मोंढे, रूपाली धारपवार, मंगला उगले, सुनीता गायकवाड, नीता विजयकर, रुबिना बानो सिकंदर शाह यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली.