शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ सर्वेक्षणापश्चात ‘संशयकल्लोळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2017 01:23 IST

शहरातील स्वच्छतेचे मूल्यांकन करुन औरंगाबादेस तपासणीसाठी गेलेल्या ‘क्यूसीआय’ पथकाला

निकालाकडे लक्ष : लाचखोरीचे गालबोट, महापालिका यंत्रणेला होणार विचारणा अमरावती : शहरातील स्वच्छतेचे मूल्यांकन करुन औरंगाबादेस तपासणीसाठी गेलेल्या ‘क्यूसीआय’ पथकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्याने सर्वेक्षणापश्चात संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी अभियानाला गालबोट लावण्याचे काम करणाऱ्या लाचखोर सर्वेक्षण पथकाच्या कारनाम्याचा अहवाल नगरविकास विभागाच्या प्रधानसचिवांसह केंद्रसरकारकडे पोहोचता करण्यात आला आहे. औरंगाबादेपूर्वी यापथकाने ज्या शहरांची तपासणी केली तेथे असा काही प्रकार घडला का, याबाबत चाचपणीचे संकेत मिळाल्याने संशयाला वाव मिळाला आहे. स्वच्छ सर्वेक्षण-२०१७ अंतर्गत शहराची स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापन व अन्य अनुषंगिक बाबी तपासणीसाठी ‘क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडिया’चे त्रिसदस्यीय पथक १७ ते १९ जानेवारीदरम्यान शहरात होते. यापथकात ‘चिफ असेसर’ चारूदत्त पाठक यांच्यासह विजय जोशी आणि गोविंद घिमिर यांचा समावेश होता. स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशपातळीवर घेण्यात येत असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत ५०० शहरांचे स्वच्छताविषयक मूल्यांकन केले जात आहे. ४ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या कालावधीत स्वच्छ शहराची तपासणी करण्याचे नियोजन ‘क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडिया’ने केले आहे. कौन्सिलने सूरत येथिल ‘न्यू स्टार डॉट कॉम’ कंपनीला विविध शहरांनी केलेल्या कामांचे मूल्यमापन करून संपूर्ण अहवाल केंद्र सरकारला सादर करण्याचे कंत्राट दिले आहे. त्यानुसार पाठक, जोशी आणि गिरामे अमरावतीत आले होते. १९ जानेवारीला यापथकातील चारूदत्त पाठक वगळता विजय जोशी आणि गोविंद घिमिर हे अमरावतीची तपासणी आटोपून औरंगाबादला गेले. तेथे जोशी आणि घिमिर यांच्यासह ‘न्यू स्टार डॉट कॉम’ कंपनीचे वरिष्ठ सहायक शैलेश बंजानिया यांनी औरंगाबाद शहर स्वच्छतेचे मूल्यांकन केले. ‘निगेटिव्ह मार्किंग’चा धाक दाखवून स्वच्छ शहरांच्या यादीत पहिल्या २०मध्ये यायचे असेल तर अडीच लाख रूपये द्यावे लागतील, अशी थेट मागणी बंजानिया यांनी स्वच्छता अभिायनाच्या प्रमुख जयश्री कुलकर्णी यांचेकडे केली. प्रकरण पीएमओंकडे स्वच्छ भारत अभियानांतर्गत सर्वेक्षण आणि मूल्यमापनाच्या कामातील लाचखोरीच्या प्रकरणाची गंभीर दखल केंद्र सरकारने घेतली आहे. हेप्रकरण आता पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचले असून त्यात कठोर कारवाईचे संकेत आहेत. स्वच्छ अभियान मिशनचे प्रमुख आणि केंद्र सरकारचे सहसचिव प्रवीण प्रकाश यांनीही याप्रकाराची दखल घेतली आहे. यापथकातील दोघांनी औरंगाबादपूर्वी अमरावती शहराचे मूल्यांकन केल्याने त्या मूल्यांकनावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे.