शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

कॅन्डलमार्चनंतर तोडफोड, चार नगरसेवकांसह २२ अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 22:30 IST

कठुआ येथील बलात्कार व हत्याप्रकरणाचा निषेध नोंदविणाऱ्या एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी कॅन्डल मार्चनंतर पेट्रोल पंपाचे कार्यालय व एका व्यापारी प्रतिष्ठानाची तोडफोड केली. त्यामुळे रविवारी रात्री कोतवाली हद्दीत तणावसदृश स्थिती निर्माण झाली होती. याप्रकरणात कोतवाली पोलिसांनी सोमवारी चार नगरसेवकांसह २२ जणांना अटक केली.

ठळक मुद्देशहरात तणावसदृश स्थिती : कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कठुआ येथील बलात्कार व हत्याप्रकरणाचा निषेध नोंदविणाऱ्या एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी कॅन्डल मार्चनंतर पेट्रोल पंपाचे कार्यालय व एका व्यापारी प्रतिष्ठानाची तोडफोड केली. त्यामुळे रविवारी रात्री कोतवाली हद्दीत तणावसदृश स्थिती निर्माण झाली होती. याप्रकरणात कोतवाली पोलिसांनी सोमवारी चार नगरसेवकांसह २२ जणांना अटक केली.पीडितेला न्याय मिळून देण्यासाठी रविवारी रात्री राजकमल चौकात एमआयएमकडून कॅन्डलमार्च काढण्यात आला. शेकडो नागरिकांनी हातात मेणबत्ती घेऊन घटनेचा निषेध नोंदविला. मात्र, रात्रीच्या सुमारास काही कार्यकर्त्यांनी मालविय चौकातील पेट्रोलपंप कार्यालयावर दगडफेक करून काचा फोडल्या. सोबतच एका व्यापारी प्रतिष्ठानावर दगडफेक केली. कार्यकर्त्यांनी गैरकायदेशीर मंडळी जमवून सार्वजनिक ठिकाणी रहदारीस अडथळा निर्माण केला आणि घोषणाबाजी केल्याने तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावून तणावाची स्थिती नियंत्रणात आणली.बारांविरुद्ध रहदारीस अडथळ्याचा गुन्हागैरकायदेशीर मंडळी जमवून रहदारीस अडथळा करणाऱ्या आरोपींना कोतवाली पोलिसांनी अटक केली. त्यात एमआयएमचे अ. नाजीम अ.रऊफ, अफजल हुसैन मुबारक हुसैन, मो. साबीर व इम्रान अब्दुल सईद या चार नगरसेवकांसह मो. इम्रान मो. याकुब, विनोद गाडे, विवेक राऊत, शेख रहेमान शेख इनायत, अब्दुल खान वहीद खान, सल्लाउद्दीन खान , समिर शहा कय्युम शहा, मो. अकील मो. हनीफ यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.त्यांना ठाण्यातून जामीन देण्यात आला.तोडफोड करणाऱ्यांनाही जामीनपेट्रोल पंप ,खादिम शोरूमची तोडफोड केल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी दहा आरोपींना अटक केली. त्यामध्ये सै.युनूस सै.हसन, अ. आरिफ अ. शफीक, रियाज खान हयात खान, अफरोज खान रशिद खान, शेख हसन शेख यासीन, सादिक शहा करिम शहा, शेख जावीद शेख बशीर, रासद खान , शेख नईम शेख ताज उर्फ नईम ईल्ली व फयाज खाँ यांचा समावेश आहे. या सर्व आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.पेट्रोलने भरलेले टँकर जाळण्याची धमकीकॅन्डलमार्च काढणाऱ्या काही तरुणांनी मालवीय चौकातील पेट्रोल पंप कार्यालयावर दगडफेक करून नारेबाजी केली. दरम्यान त्या ठिकाणी पेट्रोल असलेला टँकर जाळण्याची धमकीसुध्दा दिली. पेट्रोल पंप जला दो, मार दो, देखेंगे बाद मे, असे भाष्य करून त्या तरुणांनी चिथावणी दिली. त्यावेळी वाहतूक पोलिसांनी बंदोबस्ताची धुरा सांभाळून आंदोलनकर्त्यांना दुर सारले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. आंदोलनकर्त्यांनी टँकर जाळला असता, तर मोठा अनर्थ होण्याची शक्यता होती. याघटनेची तक्रार मोहन जाजोदीया यांनी कोतवाली पोलिसांकडे नोंदविली आहे.