शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दहा दुकाने फोडून बिनधास्त पाहत होते थिएटरात पिक्चर! एक विधीसंघर्षित बालकही ताब्यात

By प्रदीप भाकरे | Updated: January 15, 2024 17:31 IST

गुन्हे शाखेच्या युनिट एकची कारवाई

अमरावती : नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिझिलॅंड या व्यापारी संकुलातील दहा दुकाने फोडून ६३ हजार ५०० रुपये लांबविणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट एकने १४ जानेवारी रोजी रात्री अटक केली. या प्रकरणात एका विधीसंघर्षित बालकालाही ताब्यात घेण्यात आले. मयूर किशोर सोळंके (१८) व रोहित चंदूलाल विश्वकर्मा (२१, दोघेही रा. जुना कॉटन मार्केट परिसर, अमरावती) अशी अटक चोरांची नावे आहेत. विशेष म्हणजे पोलिसांनी त्यांना येथील एका चित्रपटगृहातून ताब्यात घेतले.

बिझिलॅंड व्यापारी संकुलातील दहा दुकाने फोडून त्यातील आठ दुकानातून ६३ हजार ५०० रुपयांची रोकड लांबविण्यात आली होती. १४ जानेवारी रोजी सकाळी ही घटना उजेडात आल्यावर रवी खेमचंदानी (४२, रा. सिंधी कॅम्प) यांनी नांदगाव पेठ ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास आरंभला. गुन्हे शाखेचे युनिट एकही या गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते. तपासादरम्यान तो गुन्हा हा मयूर सोळंके व त्याच्या साथीदारांनी केला असून ते सध्या एका चित्रपटगृहात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकला मिळाली. या माहितीच्या आधारावर मयूर सोळंके व रोहित विश्वकर्मा या दोघांना चित्रपटगृह परिसरातून अटक करण्यात आली. सोबतच विधीसंघर्षित बालकालाही ताब्यात घेण्यात आले.कुख्यात मयुरजवळ आढळला चायना चाकू

चौकशीदरम्यान त्या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. अंगझडतीमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेल्या मयूर सोळंके याच्याजवळ एक चायना चाकूसुद्धा आढळून आला. त्यांच्याकडून चायना चाकू, रोख ९ हजार ६० रुपये व दोन मोबाइल असा एकूण २९ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश झोपाटे, राजूआप्पा बाहेनकर, फिरोज खान, सतीश देशमुख, दिनेश नांदे, विकास गुडदे, सूरज चव्हाण, निखिल गेडाम, निवृत्ती काकड, अमोल मनोहर, भूषण पद्मणे, किशोर खेंगरे यांनी केली.