शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

सरसंघचालकांच्या आगमनानंतर प्रांत शिबिराला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 23:02 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विदर्भ प्रांत प्रवासी कार्यकर्ता शिबिराला सरसंघचालक मोहन भागवत यांच्या आगमनानंतर प्रारंभ झाला. ते २० जानेवारीपर्यंत शिबिरात पूर्णवेळ उपस्थित राहणार आहेत. शिबिरस्थळी सरसंघचालक मोहन भागवत शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता पोहोचले.

ठळक मुद्देचोख बंदोबस्त : पाच हजार शिबिरार्थींचा सहभाग, तीन दिवस पूर्णवेळ उपस्थिती

श्यामकांत सहस्त्रभोजने।लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विदर्भ प्रांत प्रवासी कार्यकर्ता शिबिराला सरसंघचालक मोहन भागवत यांच्या आगमनानंतर प्रारंभ झाला. ते २० जानेवारीपर्यंत शिबिरात पूर्णवेळ उपस्थित राहणार आहेत.शिबिरस्थळी सरसंघचालक मोहन भागवत शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता पोहोचले. त्यांचा ताफा थेट गुरुकुंजनगरात पोहोचला. त्यानंतर ७ वाजता ५ हजार शिबिरार्थी बौद्धिक कक्षात एकत्र आले. त्याठिकाणी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या आगमनानंतर विदर्भ प्रांत शिबिराला सुरुवात झाली. तीन दिवसीय शिबिरात सरसंघचालक शिबिरार्थींना मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्यासोबत सहकार्यवाह भागय्याजी, अखिल भारतीय व्यवस्थाप्रमुख मंगेश भेंडे, सहसंपर्कप्रमुख सुनील देशपांडे व अन्य क्षेत्रीय अधिकारी उपस्थित आहेत.शिबिरस्थळी सरसंघाचालक स्वागत समितीतील शिबिरात मुक्कामी असल्याने परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. येथे पोहचण्यापूर्वी सरसंघचालकांनी विदर्भ प्रांत संघचालक दिवंगत दादाराव भडके यांच्या कुटुंबीयांची सांत्वना भेट घेतली.शिबिरस्थळी सहसरकार्यवाह भागय्याजी, विदर्भप्रांत संघचालक राम हरकरे, चंद्रशेखर राठी यांनी स्वयंसेवकांना जुजबी माहिती देऊन पहिल्या सत्राचा शेवट केला.सरसंघचालकांचा एकही जाहीर कार्यक्रम नाहीसरसंघचालक मोहन भागवतांचा शिबिरस्थळी एकही जाहीर कार्यक्रम नसून, ते केवळ शिबिरातील सहभागी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. शिबिरस्थळी सरसंघचालक पूर्णवेळ उपस्थित असल्याने शहरवासीयांना त्यांच्या जाहीर कार्यक्रमाची उत्सुकता होती. शिबिरस्थळी झालेल्या पत्रपरिषदेतसुद्धा त्यांच्या जाहीर कार्यक्रमाविषयी संघ पदाधिकाऱ्यांना विचारण्यात आले तेव्हा कुठला जाहीर कार्यक्रम नसल्याचे सांगण्यात आले.