शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

अखेर दुष्काळाचे १०९ कोटी मिळणार

By admin | Updated: December 24, 2016 01:39 IST

गतवर्षीच्या दुष्काळाचा सरसकट निधी न देता जाहीर पीकविम्याच्या ५० टक्के निधी देण्याचा निर्णय उच्च

चार आठवड्यांत रक्कम देणार : विभागीय आयुक्तांचे शपथपत्र गजानन मोहोड ल्ल अमरावती गतवर्षीच्या दुष्काळाचा सरसकट निधी न देता जाहीर पीकविम्याच्या ५० टक्के निधी देण्याचा निर्णय उच्च न्यायालयाच्या फटकारानंतर राज्य शासनाने २ मार्च २०१५ ला घेतला होता. मात्र, अद्याप निधी दिला नसल्याने न्यायालयाने पुन्हा शासनाला फटकारले असता चार आठवड्याच्या आत निधी देण्याचे शासनाने मान्य केले. त्यानुसार फेब्रुवारी २०१७ पर्यंत जिल्ह्यातील १ लाख ९५ हजार ८६९ शेतकऱ्यांना १०९ कोटी ३६ लाख ५९ हजार रुपयांची मदत मिळण्याची आशा आहे. गतवर्षी शासनाने दुष्काळी जिल्ह्यांची यादी घोषित केली. त्यामध्ये अमरावती जिल्ह्याचा समावेश नव्हता. तसेच एनडीआरच्या निर्णयानंतर मदत दिली नाही. याविषयी यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार यांनी मुंबई उच्च न्यायलायाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली. यावर शासनाने ५० पैशाच्या आत पैसेवारी असणाऱ्या विदर्भातील ११ हजार ८३२ गावांमध्ये दुष्काळस्थिती जाहीर केली. अशी मिळणार सोयाबीनसाठी मदत ४पीकविम्याच्या ५० टक्के प्रमाणात जिल्ह्यात १०९३६.५९ लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. यामध्ये अमरावती १३१९.८५ लाख, भातकुली १३०५.४४, नांदगाव १७५४.६८, धामणगाव ८६०.७४, चांदूररेल्वे ११९१.७८, तिवसा ७०८४.६६, मोर्शी ७९१७.२८, वरुड ३७.९५, चांदूरबाजार २१४१.०३, अचलपूर ४०८५०२, दर्यापूर ४२१.४०, अंजनगाव ६०१.४०, अंजनगाव ६०१.१०, धारणी ७६९.९७ व चिखलदरा तालुक्यात ५१३.५४ लाख रुपयांची मदत मिळणार आहे. कपाशीसाठी ३९ कोटी मिळणार ४कपाशीपिकासाठी दर्यापूर व चिखलदरा तालुक्यात पीकविम्याच्या ५० टक्के प्रमाणात मदत मिळणार आहे. यामध्ये दर्यापुरात एक हजार ७११ शेतकऱ्यांना ३१ लाख ५७ हजार ५३६ व चिखलदरा तालुक्यात १३७ शेतकऱ्यांना ७ लाख ८६ हजार ६४४ रुपये अशी एकूण १८४८ शेतकऱ्यांना ३९ कोटी ४४ हजार १८१ रुपये मदत दिली जाईल.