शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

अडसूळ, देवपारे, वानखडे यांची उमेदवारी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 23:17 IST

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युती, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी यांच्यासह सहा उमेदवारांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केले, तर १९ उमेदवारांनी ३४ अर्जांची उचल केली. आतापर्यंत ९८ उमेदवारांनी २०५ अर्जांची उचल केलेली आहे. अर्जांची उचल व दाखल करायला मंगळवार डेडलाइन आहे. मंगळवारच्या अखेरच्या चार तासांत उमेदवारांची भाऊगर्दी जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे.

ठळक मुद्देवातावरण निवडणूकमय : आदित्य ठाकरे, अनिल देसाई, अंजली आंबेडकर आदींची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युती, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी यांच्यासह सहा उमेदवारांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केले, तर १९ उमेदवारांनी ३४ अर्जांची उचल केली. आतापर्यंत ९८ उमेदवारांनी २०५ अर्जांची उचल केलेली आहे. अर्जांची उचल व दाखल करायला मंगळवार डेडलाइन आहे. मंगळवारच्या अखेरच्या चार तासांत उमेदवारांची भाऊगर्दी जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे.अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी युतीचे उमेदवार आनंदराव विठोबा अडसूळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री प्रवीण पोटे, आमदार डॉ. सुनील देशमुख, आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार डॉ. अनिल बोंडे व मंगला अडसूळ उपस्थित होत्या. अडसुळांनी पहाटे शेगाव येथे संत गजानन महाराज व अमरावतीत अंबा व एकवीरा देवीचे दर्शन घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात (इर्र्विन) चौकात डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला हारार्पण करून शेकडो शिवसैनिकांसह रॅली काढली. यावेळी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, मुंबई येथील खासदार अनिल देसाई, युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई, पश्चिम विदर्भ संपर्कप्रमुख आमदार विजयराज श्ािंदे यांच्यासह जिल्ह्यातील भाजपचे आमदार, माजी आमदार, शिवसेना व भाजपचे जिल्हाप्रमुख, अध्यक्ष, शहराध्यक्ष, नगरसेवक उपस्थित होते. उन्हाचा तडाखा बघता, भाजपचे नगरसेवक प्रणय कुळकर्णी यांनी गर्ल्स हायस्कूल चौकात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती.भारिप बहुजन महासंघ (वंचित बहुजन आघाडी) चे उमेदवार गुणवंत देवपारे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पक्षाच्या नेत्या अंजली आंबेडकर यांच्यासह निशा शेंडे, माजी आमदार हरिभाऊ भदे, एमआयएमचे विदर्भप्रमुख मो. नाझीम, माजी जिल्हाध्यक्ष चरणदास निकासे, पश्चिम जिल्हाध्यक्ष नंदेश अंबाडकर, नामदेवराव जावरकर, अतुल नळकांडे, विवेक जावरकर, इस्माईलभाई, शालिनी पाटील, माला वानखडे, बी.पी. निशाणे, श्रीकृष्ण बोरखडे, सदानंद नागे, सतीश वानखडे, समीक्षा वानखडे आदी उपस्थित होते. बहुजन समाज पार्टीचे अरुण वानखडे यांनीदेखील सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत प्रदेश उपाध्यक्ष चेतन पवार, अनंत लांजेवार, ऋषी खत्री, राजीव बसवनाथे उपस्थित होते.यांचीही उमेदवारीअमरावती लोकसभा मतदारसंघासाठी संजय हिरामन आठवले (बहुजन महापार्टी), राजू महादेवराव सोनोने ( बहुजन महापार्टी), विनोद गाडे (आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टी), विजय विल्हेकर (स्वतंत्र भारत पक्ष), नीलिमा भटकर (पीपल्स पार्टी आॅफ इंडिया), नरेंद्र कठाणे ( राष्ट्रीय जनसुरक्षा), संजय आठवले, मीनाक्षी करवाडे, राहुल मोहोड, सिद्धार्थ बनसोड, ज्ञानश्वर मानकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली.यांनी नेले अर्जगंगा काकणे (रिपाइं सेक्युलर), अंकुश लोखंडे (आरिप), रामचंद्र वानखडे (राष्ट्रीय बहुजन काँग्रेस पार्टी), नीलम रंगारकर (भारिप), किरण रहाटे (आरपीआय), नीलिमा भटकर (पीपल्स पार्टी आॅफ इंडिया), यांनी सोमवारी राजकीय पक्षांचे नावाने उमेदवारी अर्ज नेले. त्याशिवाय इतर १४ इच्छुकांनी अपक्ष उमेदवारीसाठी अर्ज नेले. आतापर्यंत एकूण ९८ जणांनी २०५ अर्ज नेलेत.