शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अडसूळ नवनीत राणांवर खटला दाखल करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 13:40 IST

९०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची खोटी माहिती खा. राणा यांनी लोकसभा सभागृहासमोर ठेवून संपूर्ण देशवासीयांची दिशाभूल केली. या बदनामीबाबत स्वतंत्र खटला दाखल करणार असल्याची माहिती अडसूळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती:सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये ९०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याबाबतचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी गुरूवारी केला. यामधील आनंदराव अडसूळ व सुनील भालेराव यांचा नामोल्लेख लोकसभा सचिवालयाद्वारा सदस्यांना देण्यात आलेल्या खा. नवनीत राणा यांच्या भाषणाच्या प्रतीमधून वगळण्यात आला आहे. ८०० कोटी रुपयांच्या बँकेत ९०० कोटींचा झालेला घोटाळा व सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये सुनील भालेराव या नावाचा व्यक्ती खातेदार, शेअर होल्डर कर्जदार नसताना ९०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची खोटी माहिती लोकसभा सभागृहासमोर ठेवून संपूर्ण देशवासीयांची दिशाभूल करण्यात आली. खा. राणा यांनी केलेल्या बदनामीबाबत स्वतंत्र खटला दाखल करणार असल्याची माहिती अडसूळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.काय आहे याची पार्श्वभूमी?

 

मुंबई येथील सिटी बँकेत ९०० कोटींच्या घोटाळ्यात ९१ हजार खातेदारांची शिवसेना नेते आनंदराव अडसूळ व त्यांचे स्वीय सहायक सुनील भालेराव यांनी फसवणूक केली. याप्रकरणी या दोघांचेही बँक खाते सील करावे, घोटाळ्याची चौकशी व कारवाईची मागणी खासदार नवनीत राणा यांनी गुरुवारी (25 जुलै) केंद्रीय वित्तमंत्र्यांकडे लोकसभेतील चर्चेदरम्यान केली.

बोगस कंपनीची नोंदणी करून व चिटफंडाच्या नावाखाली सर्वसामान्यांची फसवणूक टाळण्यासाठी लोकसभेत गुरुवारी विधेयक मांडण्यात आले. गोरगरिबांचा पैसा सुरक्षित राहावा, यासाठी खासदार नवनीत रवि राणा यांनी या विधेयकाचे समर्थन केले. यावेळी चर्चेदरम्यान त्यांनी सभापतींच्या माध्यमातून या मागणीसाठी केंद्रीय वित्तमंत्र्यांचे लक्ष वेधले. मुंबईत सिटी बँकेच्या १० शाखा व सर्वसामान्य, श्रमजीवी वर्गातील ९१ हजार खातेदार आहेत. या बँकेत बोगस कर्जाच्या माध्यमातून ९०० कोटींचा घोटाळा झाला आहे. यामुळे बँकेचे दिवाळे निघाले, तेव्हा अध्यक्ष आनंदराव विठोबा अडसूळ यांनी एका खातेदाराला सहा महिन्यांत फक्त एक हजाराची रक्कम काढता येईल, असे स्पष्ट केले. ही खातेदारांसाठी धक्कादायक बाब आहे. याचा धसका घेतल्याने पाच ते सहा खातेदारांचा मृत्यू झाल्याचा आरोप खासदार राणा यांनी केला.

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणा