शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

दलित वस्ती सुधार योजनेला भ्रष्टाचाराचे ग्रहण

By admin | Updated: September 29, 2016 00:22 IST

नागरी भागातील अनुसूचित जातीमधील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी राबविण्यात आलेल्या दलित वस्ती सुधार योजनेलाही भ्रष्टाचाराने ग्रासले आहे.

१.२९ कोटींचा घोळ : महापालिकेतील सावळागोंधळअमरावती : नागरी भागातील अनुसूचित जातीमधील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी राबविण्यात आलेल्या दलित वस्ती सुधार योजनेलाही भ्रष्टाचाराने ग्रासले आहे. सन २०११ -१२ मध्ये या योजनेवर तब्बल १.२९ कोटी रुपये खर्च झाल्याचा दावा महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून करण्यात आला. मात्र या कोट्यवधी रुपयांचे अस्सल देयके हा विभाग लेखापरीक्षकांना उपलब्ध करुन देऊ शकला नाही. त्यामुळे या योजनेच्या यशस्वितेवरच प्रश्नचिन्ह लागले आहे.सन २०११-१२ या आर्थिक वर्षाचे सन २०१४ मध्ये औरंगाबाद येथिल लेखापरीक्षकांकडून लेखापरीक्षण करण्यात आले. प्रत्येक पैशाचा हिशेब महापालिकेकडे मागण्यात आला.मात्र, महापालिकेची तत्कालीन यंत्रणा या कोट्यवधी रूपयांची प्रमाणके सादर करु शकली नाही. प्रमाणके अभ्यासण्यासाठी वारंवार मागणीही करण्यात आली. मात्र, भ्रष्टाचार उघडकीस येऊ नये म्हणून पद्धतशीर खेळी करण्यात आली. लक्तरे वेशीवर टांगली जाऊ नयेत, यासाठी प्रमाणके दडपण्यात आल्याचे त्यावेळी बोलले जात होते. आता एकूण लेखापरीक्षणावर नजर टाकल्यास त्या आरोपांना बळ मिळाले आहे. १ कोटी २९ लाख ७३ हजार ८८५ रुपयांची प्रमाणके न मिळाल्याने या कामांच्या उपयोगितेसह ते काम प्रत्यक्षात करण्यात आले की नाही? असे नानाविध प्रश्न उपस्थित झाले आहेत. कागदोपत्री कामे दाखवून अमरावती महापालिकेत कोट्यवधी रुपयांची आर्थिक अनियमितता झाल्याचे आरोप आहेत. त्यामुळे विद्यमान यंत्रणेने बांधकाम विभागाकडे लक्ष पुरवावे ,अन्यथा २२कराच्या स्वरुपातून जमा झालेल्या पैशांवर काही मोजके लाचखोर डल्ला मारण्यासाठी सज्ज झाले आहेत. (प्रतिनिधी)बीआरजीएफमध्ये १.८९ कोटींचा घोळ मागासक्षेत्र अनुदान निधी बीआरजीएफची प्रमाणके वा संचिका लेखापरीक्षणास उपलब्ध करुन देण्यात आल्या नाहीत.त्यामुळे तब्बल १ कोटी ८९ लाख ५७ हजार रुपये ही रक्कम अमान्य करण्यात आली आहे.सन २०१०-२०१२ या आर्थिक वर्षातील योजनेचे २३ अभिलेखे वबांधकाम विभागाने लेखापरीक्षण काळात उपलब्ध करुन दिले नाहीत३६.५३ लाखांवर आक्षेपविदर्भ विकास मंडयाची प्रमाणके आणि संचिका लेखापरिक्षकांना उपलब्ध करुन देण्यात आली नाही. त्यासाठी मौखिक मागणीसोबत अर्धसमास पत्रही देण्यात आले. मात्र बांधकाम विभागाने ती मागणी धुडकावत लेखापरिक्षकांना ३६ लाख ५३ हजार २७१ रुपयांची देयके हिशेबासाठी उपलब्ध करुन देण्यात आली नाहीत.रस्ते अनुदानातील हिशेबाशी फारकतजेडीएसएमटी रस्ते अनुदान अंतर्गत १० लाख ३० हजार रुपयांची देयके बांधकाम विभाग सादर करु शकला नाही.त्यामुळे ही रक्कम अमान्य करण्यात आली आहे.ही अभिलेखे उपलब्ध करुन न दिल्याबद्दल संबंधिताकडून खुलासा घेण्याचे निर्देश असताना अद्यापपर्यंत यंत्रणेला मुहूर्त मिळालेला नाही.