शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नऊ पालिकांमध्ये प्रशासकीय राजवट

By admin | Updated: July 5, 2014 00:24 IST

राज्यातील सर्व नगराध्यक्षांना शासनाने १० जूनला दिलेली मुदतवाढ २ जुलै रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत रद्द ...

अमरावती : राज्यातील सर्व नगराध्यक्षांना शासनाने १० जूनला दिलेली मुदतवाढ २ जुलै रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत रद्द करण्यात आली. याविषयीची अधिसूचना ३ जुलै रोजी काढण्यात आली होती. अधिसुचनेनुसार ५ जुलै रोजी जिल्ह्यातील नऊ नगराध्यक्षांचा मुदतवाढ कालावधी संपुष्टात येत असल्याने त्यांना कार्यमुक्त करण्यात येणार आहे व त्याच दिवसी या नगरपंचायतींवर पुढील आदेशापर्यंत प्रशासकीय राजवट राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. जिल्ह्यातील चिखलदरा वगळता अचलपूर, अंजनगाव (सुर्जी), दर्यापूर, चांदूरबाजार, चांदूररेल्वे, धामणगाव, मोर्शी, वरूड व शेंदूरजनाघाट या नगरपरिषदांच्या नगराध्यक्षांचा कार्यकाल हा २८ जून २०१४ रोजी संपुष्ठात येणार होता. तत्पूर्वी शासनाने १० जूनला अधिसूचना काढून या पदांच्या निवडणुकांना मनुष्यबळ उपलब्ध नाही हे कारण दर्शवीत सहा महिने किंवा शासन ठरवेल त्या उक्त दिनांकाच्या अगोदरच्या दिवसापर्यंत ही मुदतवाढ होती. दरम्यान २ जुलै रोजी शासनाने आपलाच निर्णय महिनाभऱ्याच्या आत फिरवून ही मुदतवाढ रद्द केली. परिणामी विद्यमान नगराध्यक्षांचा कार्यकाल हा ५ जुलै रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे या नऊही नगराध्यक्षांना शनिवार ५ जुलै रोजी कार्यमुक्त करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. उपाध्यक्षपदाचादेखील कार्यकाळ संपुष्टात आला आहे. परंतु या निवडणुकांवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा स्थगनादेश आहे. त्यामुळे प्रभार देण्याच्या भानगडीत न पडता जिल्हा प्रशासनाने या नऊही नगरपरिषदांवर प्रशासक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)