समस्या मार्गी : एसडीओ, मुख्याधिकाऱ्यांनी सोडविले उपोषणचांदूररेल्वे : मुख्याधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे चांदूररेल्वे शहर समस्यांचे माहेरघर बनले असताना अपक्ष नगरसेवक नितीन गवळी यांनी बेमुदत उपोषण सोमवारपासून सुरू केले होते. मात्र उपोषणाच्या दुसऱ्याच दिवशी मंगळवारी प्रशासनाला झुकावे लागले. सर्व मागण्या मान्य करून उपविभागीय अधिकारी विधाते, मुख्याधिकारी गिता ठाकरे यांनी ज्यूस पाजून गवळींचे उपोषण सोडविले.नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांकडे शहरातील समस्यांची जबाबदारी आहे. मात्र चांदूररेल्वे नपच्या मुख्याधिकारी गिता ठाकरे पुर्णपणे नियम धाब्यावर बसवून कामे करीत नाही, अशी ओरड लोकप्रतिनिधींची आहे. या प्रकाराला त्रस्त होवून शिक्षण, आरोग्य व स्वच्छता सभापती नितीन गवळी यांनी सोमवारपासून नगरपरिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. पहिल्याच दिवशी विविध पक्ष, संघटनांनी उपोषणस्थळी भेट देऊन त्यांना पाठिंबा दर्शविला होता. दुसऱ्या दिवशी उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देवून चर्चा केली. नगरसेवक नितीन गवळी यांच्या मागण्या मंजूर केल्या जातील, असे लेखी आश्वासित करुन उपोषण सोडविले.
चांदूररेल्वेत नगरसेवकाच्या उपोषणापुढे प्रशासन झुकले
By admin | Updated: July 21, 2016 00:09 IST