शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

१४ जणांच्या निलंबनावर प्रशासनाचे शिक्कामोर्तब !

By admin | Updated: January 18, 2017 00:05 IST

कर्तव्यात कसूर, दप्तरदिरंगाई आणि अनियमिततेचा ठपका ठेवून जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील १४ कर्मचाऱ्यांच्या निलंबनावर प्रभारी मुख्य कार्यपालन अधिकारी जे.एन.आभाळे यांनी....

जिल्हा परिषद : प्रभारी सीईओ जे.एन.आभाळेंचा धाडसी निर्णयजितेंद्र दखने अमरावतीकर्तव्यात कसूर, दप्तरदिरंगाई आणि अनियमिततेचा ठपका ठेवून जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील १४ कर्मचाऱ्यांच्या निलंबनावर प्रभारी मुख्य कार्यपालन अधिकारी जे.एन.आभाळे यांनी शिक्कामोर्तब केल्याची विश्वसनीय माहिती आहे. एकाच वेळी तब्बल १४ कर्मचाऱ्यांना निलंबित केले जाण्याची जिल्हा परिषदेतील ही पहिलीच कारवाई होय. आभाळे यांच्या या धाडसी आणि धडाकेबाज निर्णयामुळे जिल्हा परिषदेत फोफावलेल्या भ्रष्टाचारावर अंकुश लागण्याची आशा निर्माण झाली आहे. मुख्य कार्यपालन अधिकारी किरण कुळकर्णी यांनी शुक्रवारी झेडपीच्या बांधकाम विभागाची आकस्मिक तपासणी केली होती. बांधकाम विभागात मोठ्या प्रमाणात दप्तरदिरंगाई आढळून आली. कुलकर्णी यांनी दोषींवर नियमानुसार कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानंतर कुलकर्णी प्रशिक्षणासाठी दीड महिना जिल्ह्याबाहेर असल्याने निलंबन आदेशाच्या अंमलबजावणीचा सस्पेन्स कायम होता. कारवाईची कुणकुण लागताच कर्मचाऱ्यांनी प्रभारी मुख्य कार्यपालन अधिकारी जे.एन. आभाळे यांच्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दबाव निर्माण करण्याची रणनीती वापरली होती. तथापि कुठल्याही दबावाला बळी न पडता आभाळे यांनी कर्तव्यदक्ष निर्णय घेऊन प्रशासन कौशल्याची चुणूक दाखविली. (प्रतिनिधी)आज आदेश होणार जारीअत्यंत गोपनीय असलेल्या या निलंबन कारवाईवर प्रशासकीय स्तरावर शिक्कामोर्तब झाल्याची आणि संबंधित तमाम दोषींना बुधवारी निलंबन आदेश प्राप्त होणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे. खातेप्रमुखांचे टोचले कानकर्तव्यात कसूर करणाऱ्यांमध्ये ३ खात्यांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सीईओ किरण कुलकर्णी यांनी ११ नोव्हेंबर २०१६ रोजी अधिकाराचे विकेंद्रीकरण करून खातेप्रमुखांना निलंबनाचे अधिकार बहाल केले होते. याप्रकरणी आता त्याच अधिकारांचा वापर खातेप्रमुखांना करावा लागणार आहे. दबावात येणाऱ्या खातेप्रमुखांचे कान जे.एन. आभाळे यांनी टोचल्यानंतर संबंधित खात्यांचे प्रमुख बुधवारी निलंबन आदेश जारी करतील. कारवाई कुणावर ? निलंबन कारवाईत समावेश असलेल्या सर्व १४ कर्मचाऱ्यांची नावे उपलब्ध होऊ शकली नसली तरी त्यात वित्त विभागाचे चार, बांधकाम विभागाचे दोन आणि सामान्य प्रशासन विभागाच्या अखत्यारितील ८ कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची खात्रीलायक माहिती आहे. एकूण १४ दोषींमध्ये दोन आरेखक आहेत. जालिंधर (जे.एन.) यांच्या ‘आभाळ’निर्णयाने कामचोरांमध्ये घबराट पसरणार, हे नक्की.