दोन दिवसांत १५५ नागरिकांवर कारवाई, आठ हजार रुपये दंड वसूल
परतवाडा : अचलपूर नगरपालिका क्षेत्रासह लगतच्या देवमाळी, कांडली व ग्रामीण क्षेत्रात कोरोना संसर्ग वाढला आहे. त्याला आळा घालण्यासाठी अचलपूर नगरपालिका प्रशासन रस्त्यावर उतरले आहे. मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई
होत आहे. पालिका प्रशासनाने ९ आणि १० फेब्रुवारी या दोन दिवसांत १५५ नागरिकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून ८ हजार ४० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ९ फेब्रुवारीला जयस्तंभ चौकात, तर १० फेब्रुवारी दुरानी चौकासह गांधीपुलावरही कारवाई करण्यात आली. मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांच्या मार्गदर्शनात प्रशासन अधिकारी गणेश खडके, कार्यालय अधिक्षक अमोल दहीकर, सोमेश धट, युवराज केंदे्र, सरीता अरके, प्रफुल्ल लांडगे, गौरव लोंदे, शिवम देशमुख, तुषार वाजपे, मृणालिनी पाटील, अश्विनी बारबुद्धे, श्रद्धा गोरडे, संतोष तिवारी, निशांत मिश्रा, स्वप्निल श्रीवास्तव, अविनाश वानखडे, सागर महल्ले, शब्बीरभाई, गोठवाल, राईकवार, सदाफळे यांनी पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली.
दरम्यान, महसूल विभागानेही तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात विनामास्क फिरणाऱ्यांवर ५०० रुपये दंड, दुकानदार व दुकानातील कर्मचाऱ्यांनी मास्क न वापरल्यास व शारीरिक अंतर न पाळल्यास तीन हजार रुपये दंड, रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर ५०० रुपये दंड आकारला जाणार आहे. या कावाईत अडथळा आणणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल केला जाणार असल्याचे अचलपूरचे तहसीलदार मदन जाधव यांनी स्पष्ट केले आहे.
बॉक्स
कोविड रुग्णालय ‘फुल्ल’
अचलपूर कुटीर रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये एकूण ३५ बेड आहेत. हे सर्व बेड तीन दिवसांपासून ‘फुल्ल’ आहेत. आज तरी अचलपूर कोविड हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांकरिता बेड शिल्लक नाही.