शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळासाठी प्रशासनाच्या मॅराथॉन बैठकी

By admin | Updated: November 22, 2014 22:52 IST

जिल्ह्यात मागील ३ वर्षांपासून खरीप व रबीचे हंगाम धोक्यात आले आहे. यंदा जिल्ह्याची आणेवारी ५० पैशांच्या आत केवळ ४६ पैसे आहे. या दुष्काळजन्य स्थितीत शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.

अमरावती : जिल्ह्यात मागील ३ वर्षांपासून खरीप व रबीचे हंगाम धोक्यात आले आहे. यंदा जिल्ह्याची आणेवारी ५० पैशांच्या आत केवळ ४६ पैसे आहे. या दुष्काळजन्य स्थितीत शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. पुढील आठवड्यात मुख्यमंत्री व ग्रामविकासमंत्र्यांचा दौर असल्याने जिल्हा प्रशासनात आढावा घेण्यासाठी बैठकीवर बैठकी सुरू आहे. प्रत्यक्षात कुठलीच कामे सुरू नसल्याने आता कृतीची गरज आहे.जिल्ह्याची पैसेवारी ४६ टक्के आहे. सर्वच तालुक्याची पैसेवारी ५० पैशाच्या आत आहे. म्हणजेच जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थिती आहे. सोयाबीन वाढीसाठी पुरेसा कालावधी मिळाला नाही. जमिनीत आर्द्रता नाही. यामुळे उत्पन्न घटले, खरिपासाठी जिल्ह्यात ६० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. यापैकी काही क्षेत्र निकृष्ट बियाण्यांमुळे नापेर राहिले. नजर अंदाज आकडेवारी ६० टक्के दाखविण्यात आली. प्रत्यक्षात पीक कापणीचे प्रयोग झाल्यानंतर जिल्ह्याची आणेवारी ४६ टक्क्याच्या आत असल्याची बाब स्पष्ट झाली. परिणामी जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंंडे ह्या सोमवार २४ नोव्हेंबरला जिल्ह्याच्या दोऱ्यावर येत आहे. आणि २९ नोव्हेंबरला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडनविस हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याने पाहणी, सर्व्हे अहवाल यात जिल्हा व तालुका प्रशासन व्यस्त आहे. यासाठी विभाग जिल्हा व तालुकास्तर आढावा घेण्यासाठी बैठकीवर बैठकी सूरू आहे. २१ रोजी चवथा शनिवार व नंतर रविवार सुटीचे दिवस असताना बहुतेक जिल्हा कार्यालये सुरूच होती. जिल्हाधिकाऱ्यांनी १५ नोव्हेंबरला जाहीर केलेल्या पैसेवारीनुसार अमरावती तालुक्यात ४७, भातकुली ४६, नांदगाव खंडेश्वर ४४, चांदूररेल्वे ४७, धामणगाव ४९, तिवसा ४३, मोर्शी ४६, वरुड ४९, अचलपूर ४७, चांदूरबाजार ४६, दर्यापूर ४८, अंजनगाव ४०, धारणी ४८ व चिखलदरा ४९ पैसेवारी आहे.अशा दुष्काळजन्य स्थितीमुळे आगामी काळात पाणीटंचाई, वैरणटंचाई याची भिषण स्थिती राहणार आहे. त्यावेळी काय करायचे याचे नियोजन बैठकीच्या माध्यमातून अधिकारी करीत आहे. मात्र सध्या काही ही उपाययोजना होत नसल्याने नागरिक मात्र त्रस्त आहे. ग्रामीण भागात १२ तासांपेक्षा अधिक भारनियमन नित्याचेच झाले आहे. जिल्ह्यात २०० रोहित्र जळाली आहे. रोहित्राची लागणी केल्यावर महावितरण टाळाटाळ करते, यामुळे रबी सिंचनाच्या समस्या निर्माण होत आहे. या मॅराथान बैठकीच्या माध्यमातून काहीतरी तोडगा काढावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.