शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रशासन यंत्रणा कोलमडली

By admin | Updated: July 21, 2014 23:38 IST

आपल्या विविध मागण्यांसाठी स्थानिक नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी १५ जुलैपासून बेमुदत संप पुकारला आहे. संपात नगरपालिकेच्या विविध विभागांतील सर्वच कर्मचारी सहभागी झाल्यामुळे चांदूरवासियांना न.प.

दुरवस्था : नागरिकांची विविध कामे प्रलंबित, प्रभाग घाणीच्या विळख्यातसुरेश सवळे - चांदूरबाजारआपल्या विविध मागण्यांसाठी स्थानिक नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी १५ जुलैपासून बेमुदत संप पुकारला आहे. संपात नगरपालिकेच्या विविध विभागांतील सर्वच कर्मचारी सहभागी झाल्यामुळे चांदूरवासियांना न.प. कर्मचाऱ्यांच्या या बेमुदत संपाची झळ पोहोचत आहे. त्यांची विविध कामे प्रलंबित असल्यामुळे आता नागरिकांना नगरपालिका कर्मचाऱ्यांचा संप संपण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. नगरपालिकांच्या विविध मागण्यांसाठी १५ जुलैपासून पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपामुळे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका आता संबंधित नागरिकांना जाणवू लागला आहे. अशातच शहरातील दैनंदिन स्वच्छता हा नगरातील प्रमुख मुद्दा असून शहरातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पावसाचे पाणी साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोगराई पसरण्याचे चिन्ह दिसत आहे. दुसरीकडे न.प. चा प्रकाश विभागही आता मंदावत चालला आहे. या विभागाच्या माध्यमातून शहरातील दैनंदिन पथदिवे दुरुस्तीचे कार्य चालत असल्यामुळे आता शहरातील पथदिवे बंद पडल्याने सर्वत्र अंधार पसरला आहे. मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे नागरिकांना आवश्यक ते दस्तऐवज नगरपालिकेकडून मिळू शकत नसल्याने शहरातील नागरिकांना विविध लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. जसे रहिवासी दाखले, अससमेंट नक्कल सह दैनंदिन शासकीय, निमशासकीय, कार्यासाठी लागणारे न.प. संबंधित दस्ताऐवज मिळण्याचे कार्य गेल्या १५ जुलैपासून रखडल्याने शाळकरी विद्यार्थ्यांसह नागरिकांना या संपाचा फटका बसत आहे. शहरातील साफ-सफाईचे कामबंद असल्याने नाल्या तुंबल्या असून गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी आता शहरातील मुख्य रस्त्यावरुन वाहत असल्याचे चित्र दिसत आहे. नगरातील नागरिकांना जन्म-मृत्यूचे दाखलेसह तर विभागाच्या कराचा भरणासह व्यापार संकुलातील व्यापाऱ्यांच्या पावसाळ्यातील अडी-अडचीणींसह गाळेधारकांचे विविध काम गेल्या पाच दिवसांपासून रखडले आहे. (तालुका प्रतिनिधी)