शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

६२ शिक्षकांचे रिक्त जागेवर समायोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 21:54 IST

जिल्हा परिषद शिक्षकांच्या आॅनलाइन बदली प्रक्रियेत जिल्हांतर्गत बदलीतील २८ आणि जिल्हांतर्गत बदलीत अतिरिक्त ठरलेल्या २७ व उर्दू माध्यमाच्या ७ अशा एकूण ६२ शिक्षकांचे शुक्रवारी जिल्ह्यातील रिक्त असलेल्या शाळांवर समुपदेशनाद्वारा समायोजन केले आहे.

ठळक मुद्देबदल्या : समुपदेशनाद्वारा पदस्थापना
<p>लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: जिल्हा परिषद शिक्षकांच्या आॅनलाइन बदली प्रक्रियेत जिल्हांतर्गत बदलीतील २८ आणि जिल्हांतर्गत बदलीत अतिरिक्त ठरलेल्या २७ व उर्दू माध्यमाच्या ७ अशा एकूण ६२ शिक्षकांचे शुक्रवारी जिल्ह्यातील रिक्त असलेल्या शाळांवर समुपदेशनाद्वारा समायोजन केले आहे.ही प्रक्रिया २७ जुलै रोजी झेडपीच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनात झाली. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आर.डी. तुरणकर, उपशिक्षणाधिकारी वामन बोलके उपस्थित होते.जि.प. शिक्षकांच्या प्रथमच राज्यस्तरावरून आॅनलाइन बदल्या करण्यात आल्या आहेत. यात जिल्हांतर्गत बदलीने जिल्ह्यात ७८ शिक्षक आले आहेत. यापैकी ५१ शिक्षकांना एनआयसीकडून रँडम पद्धतीने पदस्थापना देण्यात आली आहे. परंतु, यापैकी २७ व अन्य एक अशा २८ शिक्षकांना पदस्थापना दिलेली नसल्याने आंतरजिल्हा बदलीत शिक्षकांना पदस्थापनेसाठी समायोजन करण्यात आले. जिल्हांतर्गत आॅनलाईन बदली प्रक्रियेत २८ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. यासोबतच उर्दू माध्यमाच्या सात शिक्षकांचे समायोजन करण्यात आले आहे. बदली प्रक्रियेत जिल्हाभरात रिक्त असलेल्या विविध तालुक्यातील शाळांवर पदस्थापना दिली आहे. यासाठी आंतरजिल्हा, जिल्हांतर्गत बदलीतील शिक्षकांनी झेडपीत गर्दी केली होती. या प्रक्रियासाठी पंकज गुल्हाने, तुषार पावडे, राजू झाकर्डे, चव्हाण, ऋषीकेश कोकाटे आदींनी प्रशासकीय कामकाज सांभाळले.३० जुलैला विस्थापित शिक्षकांचे समायोजनजिल्हा परिषद शिक्षकांच्या आॅनलाइन बदली प्रक्रियेत विस्थापित झालेल्या १३० च्या जवळपास शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली नाही. त्यामुळे या शिक्षकांना पदस्थापना देण्यासाठी ३० जुलै रोजी समायोजनाची प्रक्रिया जिल्हा परिषदेत आयोजित करण्यात आली आहे.