शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी जननायक अजूनही उपेक्षेचा धनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 23:39 IST

आदिवासींचा जननायक बिरसा मुंडा यांचा अवघा २५ वर्षांचा कार्यकाळ भारतीय संस्कृतीची प्रेरणा जागवून गेला.

मोहन राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आदिवासींचा जननायक बिरसा मुंडा यांचा अवघा २५ वर्षांचा कार्यकाळ भारतीय संस्कृतीची प्रेरणा जागवून गेला. ब्रिटिश सरकारविरुद्ध लढा उभारणाºया क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या नावाने राज्यात एकही योजना नाही. या क्रांतिकारी जननायकाला कधी न्याय मिळणार, असा सवाल राज्यातील आदिवासींनी सरकारला विचारला आहे.भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. बुधवारी त्यांची जयंती संपूर्ण देशात साजरी केली जाणार आहे. बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंड राज्यातील रांचीजवळील लिहतू या आदिवासी गावात झाला. ब्रिटिशांच्या राजवटीत आदिवासींचा वनसंपत्तीवरील अधिकार बाधित झाला. तेव्हा त्यांनी इंग्रजांविरुद्ध मोठा लढा उभारला होता. सन १८९४ मध्ये राज्यात भीषण दुष्काळ, उपासमारीने अनेक लोक मरण पावले. त्यावेळी त्यांनी नि:स्वार्थी अंत:करणाने समाजाची सेवा केली. ब्रिटिश सरकारने आकारलेला अवाजवी शेतसारा माफ करण्यासाठी त्यांनी जनआंदोलन उभारले होते. त्यावेळी बिरसा मुंडा यांना दोन वर्षांचा कारावास झाला होता.आदिवासी आमदार कधी घेणार दखल?झारखंड, बिहार, ओडीशा, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेशात आदिवासी समाज बिरसा मुंडा यांना दैवत मानतो. झारखंडात बिरसा मुंडा कन्यारत्न योजना सुरू आहे. परंतु, महाराष्ट्रात एकही योजना या क्रांतिवीराच्या नावाने राबविण्यात आली नाही. राज्यात सर्वपक्षीय २५ आदिवासी आमदार आहेत. त्यांनी दखल घेतल्यास बिरसा मुंडा यांच्या नावाने राज्यात एखादी योजना सुरू होऊ शकेल.संसदेबाहेर दिल्लीत बिरसा मुंडा यांचा पुतळा आहे. इतर राज्यात बिरसा मुंडा यांच्या नावाने अनेक योजना सुरू आहेत. मात्र, महाराष्ट्रात एकही योजना नाही. त्यांच्या जयंतीला शासकीय कार्यक्रम, विविध योजना राबविल्यास बिरसा मुंडा यांना खºया अर्थाने आदरांजली वाहिली जाईल.- जनार्र्दन नेवारे, सौंदळ