शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या आदित्यने चार तास पोलिसांना धरले वेठीस

By admin | Updated: July 14, 2014 00:47 IST

माझ्या आई-वडिलांनी मला मुंबईवरून चिखलदरा फिरायला

१३ वर्षीय मुलाचा प्रताप : आई-वडील सोडून गेल्याची बतावणीनरेंद्र जावरे चिखलदरामाझ्या आई-वडिलांनी मला मुंबईवरून चिखलदरा फिरायला आणले. एका पांढऱ्या रंगाच्या तवेरा गाडीत आम्ही आलो होतो. परंतु शनिवारी ते मला सोडून निघून गेले. एका १३ वर्षीय मुलाच्या या माहितीने चिखलदरा पोलिसांना धक्का दिला. दुपारी १२ वाजतापासून त्याच्या आई-वडिलाची सुरू झालेली शोधमोहीम चार तासांच्या खुलाशानंतर मुलाचा खोटारडेपणा उघडकीस आला. आदित्य राजेंद्र टेकाडे (१३, रा. वाशी मुंबई) असे त्या मुलाचे नाव आहे. रविवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान तो चिखलदरा येथील आयटीआय चौकावर परतवाड्याकडे जाणाऱ्या वाहनांना हात दाखवीत होता. काही वेळाने चिखलदरा पोलीस ठाण्याचे जमादार रामचंद्र बुरनासे व अरुण कळसकर हे दुचाकीने जात असताना त्यांना सदर मुलगा दिसला. संशयाची पाल मनात आल्याने त्यांनी मुलास विचारणा केली. आदित्यने उपरोक्त घटनाक्रम कथन करताच दोघांनाही धक्का बसला. त्याला प्रेमाने पोलीस ठाण्यात आणून त्याची विचारपूस केली. आम्ही शनिवारी चिखलदरा फिरायला आलो. त्यांनी मला सनसेट पॉर्इंटवर सायंकाळी ६ वाजता आणले व मला सोडून निघून गेल्याचे सांगितले. पॉर्इंट काढले पिंजूनचिखलदरा हे विदर्भाचे पर्यटन स्थळ. पूर्वी येथील खोल दरीत मोठ्या प्रमाणात आत्महत्या, हत्यासारख्या घटना घडल्या आहेत. पोलिसांनी आदित्यला सर्व पॉर्इंट फिरविले. वारंवार प्रेमाने माहिती विचारली, जेवायला दिले. त्याने अमरावती येथील गाडगेनगरात बहीण राहत असल्याचे सांगितले. त्याच्या वडिलांच्या दूरध्वनीवर संपर्क केला; परंतु झाला नाही. त्यामुळे सर्व पोलीस यंत्रणा ठाणेदार बी. आर. गिते यांच्या मार्गदर्शनाखाली कामाला लागली. चार तासांपर्यंत पत्रकारांपासून सामाजिक कार्यकर्त्यांना संपर्क साधून माहिती देण्याचे कार्य नगरसेवक अरूण तायडे यांनी केले.अन् खुलासा झालापोलीस सतत चार तास आदित्यची विचारपूस करीत होती. परंतु आई-वडिलांनी सोडून दिल्याचे तो सांगत होता. अशात हरिकेन पॉर्इंटवर त्याच्या शोधात निघालेले शिक्षक व पोलिसांची गाठ पडली व खुलासा झाला. आदित्य मुंबई (वाशी) येथील आहे. त्याला पालकांनी शिक्षणासाठी चिखलदरा येथील दीपशिखा शाळेत शनिवारी आणून दिले होते. परंतु आपणास येथे राहायचे नसल्यामुळे आपण हा पर्याय निवडल्याचे त्याने सांगितले. तेव्हा सर्वांचा जीव भांड्यात पडला. परंतु सतत चार तास त्याने पोलिसांना वेठीस धरले. आदित्यला सायंकाळी पाच वाजता शिक्षकांच्या स्वाधीन करण्यात आले. अमरावती येथील बहिणीकडे त्याला आता पोहचवून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.