फोटो ०६ एएमपीएच १६
कॅप्शन - लॉकडाऊनच्या प्रारंभी मंगळवारी अमरावती शहरातील स्थिती
-----------------------------------------------------------------------------------
अमरावती : राज्य शासनाने लागू केलेल्या लॉकडाऊनचे नागरिकांनी पहिल्या दिवशी मंगळवारी पालन केले. मात्र, लॉकडाऊन नको, रोजगार द्या, अशी भूमिका घेत दुकाने, प्रतिष्ठानांतील कामगारांनी महापालिकेत धडक दिली. दरम्यान, पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना व्यापारी, दुकानदार शिष्टमंडळाने भेट घेत लॉकडाऊन हटविण्याची मागणी करण्यात आली. कामगारांनी राजकमल चौकात निदर्शने देत लॉकडाऊनचा विरोध केला.
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनादेखील कामगारांचे शिष्टमंडळ, चेंबर ऑफ अमरावती महानगर मर्चंट्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष सुरेश जैन, सचिव घनश्याम राठी यांनी लॉकडाऊनचा विरोध केला. आज सकाळपासून लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अंमलबजावणीसाठी महापालिका, जिल्हा प्रशासन सज्ज झाले असताना अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त कोणतेही दुकाने अथवा प्रतिष्ठाने सुरू नव्हती. मात्र, लॉकडाऊन जाहीर झाल्याचा सर्वच स्तरांवरून विरोध नोंदविण्यात आला. संघर्ष कृती समितीने विवाह सोहळ्याशी निगडीत व्यवसायांना परवानगी देण्याची मागणी विनोद डागा, टॉय लिओ आदींनी केली.
---------